लातूर – 53 महाराष्ट्र बटालियन एनसीसी लातूर येथील वार्षिक प्रशिक्षण शिबिर दि. 30 रोजी संपन्न झाला . हा कँप 21 ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीत छत्रपती संभाजीनगर विभागातील 09 एनसीसी बटालियन चे कॅडेट सहभागी झाले होते .हा कॅम्प सिद्धेश्वर – रत्नेश्वर देवालय लातूर च्या परिसरामध्ये आयोजित करण्यात आला.

या प्रशिक्षण शिबिराचा समारोप सोमवार सायंकाळी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत झाला .या प्रशिक्षण शिबिर समारोप समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून सिद्धेश्वर -रत्नेश्वर देवस्थानचे विश्वस्त अशोक भोसले, सुरेश गोजमगुंडे ,व्यंकटेश हालिंगे, ओम गोपे यांची उपस्थिती होती . या समारंभाच्या अध्यक्षस्थानी कॅम्प कमांडंट कर्नल संतोष नौगण व डेप्युटी कॅम्प कमांडंट वाय बी सिंह होते.यावेळी प्रमुख अतिथी अशोक भोसले यांनी मार्गदर्शन करताना चरित्र, नेतृत्व ,देशभक्ती ,शिस्त आदी गुणांचा अंगीकार करून राष्ट्राच्या उभारणी मध्ये हातभार लावण्याचे आव्हान केले .आपल्या अध्यक्षीय समारोपात कर्नल संतोष नौगण यांनी कॅम्प दरम्यान केलेल्या सहकार्याबद्दल सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवालयाचे विश्वस्त व प्रशासक सचिन जांबूतकर,महानगरपालिका चे प्रशासन, आरोग्य विभाग ,मंदिर कर्मचारी यांचे आभार व्यक्त केले.कॅम्प दरम्यान झालेल्या विविध उपक्रमात अति विशिष्ट कार्य केलेल्या कॅडेसटना प्रमाणपत्र, मेडल देऊन त्यांचा गौरव करण्यात आला .यामध्ये बेस्ट फायरर संस्कृती आदटतराव, बांगर श्री ,मुळे सच्चिदानंद, बेस्ट पायलट म्हणून येवतीकर विघ्नेश, चाटे ऋषिकेश, चाऊस महेक,नंदिनी ठाकूर,गार्ड ऑफ ऑनर मध्ये शर्मा आलोक,शिंदे सार्थक,शेख वाजिद,सुरवसे हितेश, सैन रुमासिया, लवांड वैष्णवी,पवार पायल,ढगे भक्ती यांना गौरवण्यात आले.कॅम्प दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात विविध शाळा व महाविद्यालयातील मुले व मुली यांनी सहभाग नोंदवून आपल्या कलागुणांना वाव दिला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅप्टन ज्ञानेश्वर चिट्टमपल्ले व चीफ ऑफिसर महावीर काळे यांनी केले.या कॅम्पच्या यशस्वीतेसाठी सुभेदार मेजर शंभू सिंग,के एम क्षिरसागर ,नमनगे जगदीश,विलास राऊत,सुभेदार देशराज सिंह, उत्तम पाटील, बाजीराव पाटील, संजय चिकणे , पाशा शेख ,बी एच एम शिवशंकर निकम,कार्यालयीन हेडक्लार्क घोगरे बी व्ही,व आर आर पवार,विठ्ठल गवळी ,प्रदीप सूर्यवंशी ,कृष्णा शेळके, तसेच सर्व पीआय स्टाफ व एनसीओ , बटालियनचे सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


