जकेकूर गावाजवळ अपघात; दोघे गंभीर जखमी

0
435

उमरगा:– तालुक्यातील मुंबई – हैद्राबाद महामार्गावरील जकेकूर गावाजवळ दुचाकीचा अपघात होऊन दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना दि.01 रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.उमरगा शहरालगत असलेल्या जकेकूर गावातून जाणाऱ्या मुंबई- हैदराबाद महामार्गावर दि. 01 रोजी सकाळी ठीक 8:00 वाजता तुळजापुर येथुन दर्शन घेऊन परत येताना जकेकुर गावाजवळ दुचाकी क्र. KA 32HK 2921 च्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात झाला. या अपघातात मंजुनाथ रेवणसीध्द हडपद वय- 35 वर्ष रा. काळगी, जिल्हा गुलबर्गा हा गंभीर दुखापत होउन जखमी झाला तर शरणाप्पा पडपती हा कीरकोळ जखमी झाला आहे .सदर अपघाताची माहिती मिळताच उमरगा चौरस्ता येथील जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणीज धाम ची रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जखमीला खाजगी रुग्णालयात दाखल केले असल्याची माहिती रुग्णवाहिका चालक शेषेराव लवटे यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here