प्रतिभा निकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मुरूम येथे वादविवाद स्पर्धा 

0
74

 

उमरगा :–  तालुक्यातील मरूम येथील नगर शिक्षण विकास मंडळ संचलित,प्रतिभा निकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक मुरूम येथे तालुकास्तरीय वाद-विवाद स्पर्धेचे आयोजन विद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आले होते, सांस्कृतिक विभागच्या वतीने शिक्षणमहर्षी चैतन्यमूर्ती कै. माधवराव (काका) पाटील यांच्या नावाने वर्ष 1 पहिले तालुकास्तरीय विद्यालयीन स्पर्धेचे आयोजन दि. 6 रोजी आयोजित करण्यात आले. शिक्षणमहर्षी/चैतन्यमूर्ती कै.माधवराव पाटील यांनी या परिसरातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी म्हणून संस्थेने लावलेल्या रोपट्याचे वटवृक्षांमध्ये रूपांतर झाले आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा व व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा म्हणून या पहिल्या वर्षी वादविवाद स्पर्धेचे आयोजन केले आहे.यावेळी प्रथम द्वितीय तृतीय व उत्तेजनार्थ येणाऱ्यांना त्यांचा सन्मान बक्षीस शाल व स्मृतिचिन्ह रोख देवून प्रमाण पत्र देऊन करण्यात आले. यात प्रथम क्रमांक छत्रपती शिवाजी महाविद्यालय बलसुर यांनी स्मृतीचिन्ह शाल,प्रमाणपत्र रोख रक्कम 5001,तर द्वितीय क्रमांक कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय मुरूम स्मृतिचिन्ह शाल प्रमाणपत्र रोख रक्कम 3001, तृतीय क्रमांक प्रतिभा निकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मुरूम स्मृतिचिन्ह शाल प्रमाणपत्र रोख,2001 तर उत्तेजनार्थ प्रतिभा निकेतन माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय मुरूम येथील सगर प्रणिता प्रताप 501 रुपये ज्येष्ठ प्राध्यापक संजय गिरी यांचे आजोबा स्वातंत्र्यसैनिक यांच्या स्मरणात. यात प्रथमच प्रतिभा निकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने दोन आदर्श शिक्षक पुरस्कार माध्यमिक व उच्च माध्यमिक देण्यात आले यात माध्यमिक विभागातून नगर शिक्षण विकास मंडळ संचलित नूतन प्राथमिक विद्यामंदिर येथील सहशिक्षक बसवराज हणमंतराव पाटील यांना तर उच्च माध्यमिक विभागातून प्राध्यापक उमाकांत महामुनी यांना स्मृतीचिन्ह शाल फेटा देऊन सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमाचे उद्घाटन उमरगा जनता बँकेचे चेअरमन तथा नगर शिक्षण विकास मंडळाचे संचालक शरण भैय्या बस्वराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य उल्हास घुरघुरे , प्रमुख उपस्थिती नगर शिक्षण विकास मंडळाचे सचिव व्यंकटराव जाधव, संचालक  डॉ.सतीश शेळके,प्रमुख पाहुणे उमरगा पंचायत समिती माजी सभापती गोविंद पाटील,माजी उपनगर अध्यक्ष श्रीकांत बेंडकाळे,माजी नगरसेवक सुरेश शेळके, भाजपा मुरूम शहर अध्यक्ष गणेश अंबर, प्राचार्य अशोक सपाटे,उपप्राचार्य चंद्रकांत बिराजदार,डी.व बी फ्रामशी प्राचार्य डॉ. सदाक वल्ली, उपमुख्याध्यापक कोढारे आर.बी., परवेक्षक विवेकानंद परसाळगे,माजी प्राचार्य के. के.माजी प्राचार्य मिरगळे सर,सरपंच योगेश राठोड,शिक्षक नेते विलास कांटेकुरे,जिल्हा परिषद मुख्याध्यापक विजयकुमार देशमाने,प्रा.संजय गिरी,प्रा.नाकाडे सुधीर शेषराव,प्रा.कांबळे अण्णाराव बाबुराव, प्रा.सोलंकर नारायण त्र्यंबक,प्रा. रामपूरे सतिश नामदेव,प्रा.सुर्यवंशी अजित सुर्यकांत,प्रा.बंडगर बिभीषण दत्तात्रय,प्रा.अंबर विश्वजीत चंद्रकात, प्रा.राठोड दयानंद लक्ष्मण, प्रा.धर्माधिकारी राघवेंद्र शामाचार्य, प्रा. गायकवाड अमोल मनोहर,प्रा.वाकडे रत्नदीप राजेंद्र, प्रा.जमादार सलीम गणी, प्रा.राठोड अजित मोतीराम, प्रा.कु.उण्णद रेखा रमेश, प्रा.सांगळे दीपक उद्धव,प्रा.सरस्वती तपसाळे, प्रा.माधवी नरगिडे,प्रा. सगशेट्टी महेश, प्रा.कु.महामुनी साक्षी संजय,फिरोज कागदी,राजू कोळी,धनराज कांबळे आदींची उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सतीश रामपुरे , प्रास्ताविक प्रा.उमाकांत महामुनी आभार प्राध्यापक अण्णाराव कांबळे यांनी मानले.कार्यक्रमाचे आयोजन प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्याने अतिशय उत्तम रीतीने पार पडले. शेवटी आभारप्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here