भूमिपुत्र वाघ यांना डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलाम राष्ट्रीय समाजसेवा पुरस्काराने सन्मानित

0
57

 

 

पूणे :–  येथील काव्यमित्र संस्थेच्या वतीने दिला जाणारा सामाजिक क्षेत्रातला सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पुरस्कार  समाजसेवक,गीतकार,चित्रपट निर्माते,लेखक,दिग्दर्शक, साहित्यिक,एकपात्री नाटककार, शिवश्री भूमिपुत्र वाघ यांना दिनांक 5 रोजी तारांगण विज्ञान केंद्र पिंपरी चिंचवड(पुणे) या ठिकाणी डॉक्टर ज्येष्ठ कवी समीक्षक सुरेश वाघचौरे,नारायण काळबांडे,उद्योजक संतोष शहा, डॉक्टर डी बी इंगळे, डॉक्टर राजू चौधरी, संयोजक तथा काव्य मित्र संस्थेचे संस्थापक विश्वस्त राजेंद्र सगर या मान्यवरांच्या शुभ हस्ते मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यासोबत डॉक्टर डी बी इंगळे यांच्या मराठी गजलीचे व्याकरण हा शोधनिबंध या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.यावेळी समाज विकास संस्थेच्या संस्थापिका शिवमती विजया वाघ या उपस्थित होत्या.याच सोबत कला, साहित्य,संस्कृती,आरोग्य,आणि सामाजिक क्षेत्रामध्ये महाराष्ट्रातील विविध भागातून ज्यांनी स्वत:ला वाहून घेतलं, समर्पित केलं. अशा ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मानही याप्रसंगी करण्यात आला. या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील सामाजिक क्षेत्रातले विविध मान्यवर उपस्थित होते,यात उत्तरदायित्व NGO फाउंडेशनचे खजिनदार विलास कुलकर्णी, हरिचंद्र ढाकणे, नागेश गायकवाड,अरुण सूर्यवंशी, प्रकाश पाचपिंडे,माधवराव भोसले, नितीन वाघमारे, प्रतिभा वाघमारे, संजय घोडके,घोडके ताई,ज्योती पाचपिंडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदिका आरती मलकपूरे, साक्षी सगर यांनी केले.तर आभार राजेंद्र सगर यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here