उमरगा :– नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी अंतू बळी पतंगे सभागृहात आरक्षण सोडत दि8 रोजी जाहीर करण्यात आली. यामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात प्रभाग निहाय सोडत जाहीर करण्यात आले. यात महिलाना पन्नास टक्के आरक्षण देण्यात आले असुन, एकुण 12 प्रभागातून 25 सदस्य निवडणूक लढवणार असून यापैकी 13 सदस्या ह्या महिला राहाणार आहेत .शहरातील अंतबळी पतंगे सभागृहात दि 8 रोजी सकाळी पिठासन अधिकारी तुझा उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर यांनी जिल्हा परिषद शाळेतील लहान मुला मुलींना घेऊन चिट्टया काढून हे आरक्षण जाहीर करण्यात आले .प्रभाग निहाय आरक्षण मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर यांनी वाचुन दाखवून नियमा प्रमाणे आरक्षण जाहीर करण्यात आले .प्रभाग क्रमांक 1- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला),सर्वसाधारण (अनारक्षित),प्रभाग क्रमांक 2- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला),सर्वसाधारण (अनारक्षित),प्रभाग क्रमांक- 3 अनुसूचित जाती (महिला),सर्वसाधारण (अनारक्षित),प्रभाग क्रमांक- 4 अनुसूचित जमाती (महिला),सर्वसाधारण (अनारक्षित)प्रभाग क्रमांक 5- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला),सर्वसाधारण (अनारक्षित), प्रभाग क्रमांक 6- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला),सर्वसाधारण (अनारक्षित),प्रभाग क्रमांक 7- अनुसूचित जाती (महिला),सर्वसाधारण (अनारक्षित)प्रभाग क्रमांक 8- नागरिकांचा मागास प्रवर्ग,सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्रमांक- 9 अनुसूचित जाती , सर्वसाधारण (महिला)- प्रभाग क्रमांक 10 नागरिकांचा मागास प्रवर्ग,सर्वसाधारण (महिला),प्रभाग क्रमांक 11 – अनुसूचित जाती,सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्रमांक -12 नागरिकांचा मागास प्रवर्ग,सर्वसाधारण (महिला),सर्वसाधारण (महिला)साधारण आशा प्रकारे आरक्षण जाहीर करण्यात आले असुन, आरक्षण जाहीर होताच अनेकांच्या चेहऱ्यावरील हासू गायब झाल्याचे दिसून आले .अनेकजण नगर परिषदेचा सदस्य बनण्यासाठी गुडग्याल बाशिंग बांधून तयार आहेत परंतु काही ठिकाणी आरक्षण सोडत मना सारखी झाली नसल्याने नाराज झाले आहेत पण नगराध्यक्ष पदावरून सर्वसाधारण प्रवर्गामधून नगराध्यक्ष कोण होणार याकडे मात्र सर्वाचे लक्ष लागले आहे .याप्रसंगी उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, नगर परिषद चे मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर शहरातील विविध पक्षाचे वरिष्ठ नेते, ज्येष्ठ नागरिक आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


