धाराशिव :– जिल्ह्यातील आठ पंचायत समितीं सभापतीपदांची आरक्षण सोडत जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या उपस्थितीत व शालेय विद्यार्थिनींच्या हस्ते चिठ्ठ्या काढून लोकसंख्येच्या प्रमाणात व मागील आरक्षण ग्राह्य धरुन आज ९ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आले. धाराशिव जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी ११ वाजता आरक्षण सोडत काढण्यात आली.प्रथम जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी आठ तालुक्यातील मागील पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी सोडण्यात आले होते,याचे वाचन केले.त्यानंतर धाराशिव शहरातील जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या इयत्ता पाचवीमधील विद्यार्थिनी शेख मारिया इस्माईल व शेख इकरा रईस यांच्या हस्ते चिठ्ठ्याद्वारे सभापती पदांची आरक्षणाची सोडत काढण्यात आली.यामध्ये जिल्ह्यातील उमरगा पंचायत समितीचे सभापतीपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे.धाराशिव,कळंब व परंडा या पंचायत समितीचे सभापतीपद सर्वसाधारण महिलांसाठी निघाले आहे.तर लोहारा पंचायत समितीचे सभापतीपद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) आणि वाशी पंचायत समितीचे सभापती पद नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिलांसाठी राखीव सोडण्यात आले आहे.तर भूम आणि तुळजापूर पंचायत समितीचे सभापतीपद सर्वसाधारणसाठी खुले करण्यात आले आहे. यावेळी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) स्वाती शेंडे,जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे,जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) तुकाराम भालके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) अनंत कुंभार,निवडणूक नायब तहसिलदार सचिन पाटील,सहाय्यक महसूल अधिकारी श्रीहरी गाढवे,दत्तात्रय मोरे,सुजित टिके,कनिष्ठ सहाय्यक प्रवीण इंगळे व संदीप कारभारी यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी,पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Home ताज्या बातम्या पंचायत समिती सभापती पदांसाठी आरक्षण ठरले : जिल्हाधिकारी पुजार यांच्या उपस्थितीत सोडत


