उमरगा – महाविकास आघाडीचे उमेदवार प्रवीण स्वामी यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीच्या वतीने ता. 15 रोजी मुरूम शहरात प्रचारदौऱ्याचे आयोजन करण्यात करण्यात आले.शहरातील किसान चौकातील महादेव मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात करण्यात आली.
शहरातील, मारुती मंदिर, कपिलेश्वर मंदिर, चर्मुर्ती मठ, नागोबा गल्ली, नारळी मठ, गांधी चौक,सराफ लाईन, हनुमान चौक, टिळक चौक, माळी गल्ली ,सैदा गल्ली, ख्याडे गल्ली, महामुनी गल्ली, डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचनालय अशोक चौक या ठिकाणी भेटी दिल्या. यावेळी महाविकास आघाडीच्या वतीने प्रवीण स्वामी यांना प्रचंड मताने विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख बसवराज वरणाळे, युवासेना तालुका प्रमुख अजित चौधरी, काँग्रेसचे राहुल वाघ, शिवसेना शहर प्रमुख जगदीश निंबर्गे, उपप्रमुख विशाल मोहिते, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अर्जुन बिराजदार, सतीश जाधव , अमित रेड्डी सह दादासाहेब गायकवाड, नेताजी गायकवाड, शुभम नागुरे, जयशिंग खंडागळे, राघवेंदर चौधरी, प्रवीण बिराजदार, सुमित पांढरे, विकास शिंदे, संजय आळंगे, प्रथ्वीराज चौधरी, दत्ता चौधरी, बशीर कागदे ओमकार कुंभार व्यंकटेश बिराजदार, पंकज कांबळे, मनोज स्वामी आदींची उपस्थिती होती.