उमरगा:– शहरातील सर्व दिव्यांगांना न. प कार्यालयाच्यवतीने देण्यात येणारा पाच टक्के निधी तात्काळ देण्यात यावा अशी मागणी नगरपरिषद चे मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर यांना दि. 8 रोजी देण्यात आलेल्या एका निवेदना मार्फत प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. निवेदनात, उमरगा शहरातील दिव्यांग अपंग यांना नगर परिषद कार्यालयाच्या वतीने पाच टक्के निधी दिला जातो.तो निधी तात्काळ देण्यात यावा. अतिवृष्टी या नैसर्गिक आपत्ती मुळे दिव्यांग संकटामध्ये आले आहेत त्यातच आता दिवाळी हा सन ऐन तोंडावर ७ ते ८ दिवसांवर आलेला आहे. या सर्व बाबींचा मुख्याधिकारी यांनी गांभीर्य पूर्वक विचार करून तात्काळ ५ टक्के निधी वितरीत करावे अन्यथा नगरपरिषद कार्यालयासमोर अपंगाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी अशी विनंती करण्यात आली आहे. निवेदनावर इसाक शेख,रामेश्वर मदने, संतोष शिराळे,चाँद शेख,एजाज शेख, संगीता स्वामी, संतोष पांचाळ आदींच्या स्वाक्षरी आहेत.


