उमरगा:- तालुक्यातील येळी गावाजवळ असलेल्या एका पेट्रोल पंपावर क्रेनच्या माध्यमातून काम सुरू असताना क्रेनवरुन पडून सुरूवातीला गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना दि.12 रोजी घडली आहे.सविस्तर वृत्त दि. 12 रोजी येळी गावाजवळ असलेल्या एका पेट्रोल पंपावर क्रेन च्या माध्यमातून काम सुरू असताना क्रेनवरुन पडल्याने मध्यप्रदेश येथील युवक अजित ठाकुर वय- 27 वर्ष ,रा. जबलपूर हा गंभीर रीत्या जखमी झाला होता.रुग्णालयात दाखल करुन उपचार सुरु असताना मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे.सदर अपघाताची माहिती मिळताच उमरगा चौरस्ता येथील जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणिजधाम ची रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जखमीला उप जिल्हा रुग्णालय उमरगा येथे दाखल केले परंतु डॉक्टराने तपासणी करून मयत घोषीत केले.असल्याची माहिती रुग्णवाहिका चालक शेषेराव लवटे यांनी दिली आहे.

