उमरगा : उमरगा तालुक्यातील समुद्राळ येथे रविवार दि . १२ रोजी भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखाना संचलीत क्वीनर्जी इंडस्ट्रीज लि . चा सन २०२५ च्या आठव्या ऊस गळीत हंगामाचे बॉयलर पुजन संचालक राजेंद्र माने व सौ मिना माने यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आले तर बॉयलर अग्नीप्रदिपन कारखान्याचे चेअरमन प्रा . सुरेश बिराजदार , संचालक साहेबराव पाटील, व्यंकटराव सोनवणे, योगीराज कदम,इमाम पटेल, तुकाराम बिराजदार तर सिद्राम जाधव ,भिमा स्वामी ,मारुती पाटील, नेताजी कवठे, राम जाधव, अशोक कारभारी, महेश भगत ,सुनील साळुंखे, शमशोद्दीन जमादार,दत्ता वाडीकर,शिवाजी पवार, सचिन सरवदे , यांच्या हस्ते करण्यात आले .
यावेळी बोलताना चेअरमन प्रा .सुरेश बिराजदार यांनी कारखान्याची वाटचाल अत्यंत संघर्षातुन झाली आहे. आज भाऊसाहेब बिराजदार कारखान्यामुळे जिल्हाभरातील कारखान्यांचा ऊस दर पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर मिळत आहे .यावर्षीचा गाळप हंगाम मोठा आहे .कारखान्याने दहा लाख मे. टन ऊस गळफाचे उद्दिष्ट ठेवले आहे . गाळपासाठी 339 ट्रॅक्टर , 185 मिनी ट्रॅक्टर ,200 बैलगाड्या, 25 हार्वेस्टर अशी ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणा उभारण्यात आली आहे .कारखाना कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊस गाळप झाल्याशिवाय गाळप बंद करणार नाही.योग्य व वेळेत ऊस बिल देण्यात येईल .गाळपासाठी जास्तीत जास्त ऊस भाऊसाहेब बिराजदार कारखान्याला पुरवठा करावा ,ऊस उत्पादकांनी गाळपासाठी संयम ठेवावा असे आवाहन यावेळी बोलताना केले .
याप्रसंगी कारखान्याचे जनरल मॅनेजर बी.जे. पाटील , चीफ इंजिनीयर आर.पी. मीरगळ , चिफ केमिस्ट .एस.बी. पांढरे , डिस्टीलरी मॅनेजर डी.बी.कोळगे , शेतकी आधिकारी ए .आर. शेंडगे , एस एस .त्रिगुळे यांच्यासह , तुकाराम बिराजदार, योगीराज स्वामी , संजय जाधव,अजित पाटील, प्रताप महाराज, विजय पाटील ,विष्णू भगत,रणजीत बिराजदार, प्रदिप गावकरे, देविदास पावशेरे ,काशिनाथ गायकवाड, यशवंत जाधव ,अप्पू हिप्परगे,सत्यनारायण जाधव,कल्लेश्वर जाधव,अभय पाटील ,कृष्णा मदनसुरे ,अमोल खोंडे,जयचंद्र जाधव,शिवाजी उपासे,मुरलीधर पाटील,यांच्यासह उमरगा लोहारा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी मोठया संखेने उपस्थित होते .


