उमरगा;– तालुक्यातील येणेगुर येथील मुस्लिम समाज कमिटीच्या वतीने मोहम्मद पैगंबर(स.व.) यांच्या 5 सप्टेंबर रोजीच्या जयंती निमित्ताने पैगंबर यांनी मानवतेला दिलेल्या शिकवणीवर व त्यांच्या जीवनावर आधारित स्पर्धा परीक्षेचे आयोजन दि. 12 रोजी कॅप्टन जोशी स्मारक विद्यालय येथे करण्यात आले होते. यामध्ये हाफिज दिलशाद बागवान व कारी जाकीर मुंशी, हाफिज सलीम मकानदार, यांनी स्पर्धा परीक्षा घेऊन समाजातील तळागाळापर्यंत त्यांची शिकवण पोहोचवण्याचा प्रयत्न येथील मुस्लिम समाजाने केला आहे. या परीक्षेमध्ये एकूण 154 विद्यार्थी नोंदणी केलेले होते त्यापैकी 144 उपस्थित राहून परीक्षेला सामोरे गेले यातून गुणवंत विद्यार्थ्यांचा क्रमांक काढून योग्य असे बक्षीस दिले जाणार आहे .यावेळी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष देवराज बिराजदार यांनी शाळा उपलब्ध करून देऊन उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले. याप्रसंगी परीक्षक म्हणून धर्मगुरू जाकीर मुन्शी, हाफिज दिलशाद बागवान, हाफिज सलीम मकानदार, आसिफ मुल्ला, जावेद माळवाले ,अजीम खजुरे, इस्माईल तांबोळी, इरफान पटेल ,अकमल तांबोळी यांनी काम पाहिले. या परीक्षेस कमिटीचे अध्यक्ष मोहदीन मटके, सचिव युनुस देशमुख,समद वरनाळे, कोकळगावे सर, रियाज सर, भालके सर,आरिफ येळीकर, फिरोज मुंशी, मोबाईल हाफिज हाजी मलंग फरकांडे, आयुब मुंशी, शरीफ भोसले वाले, वाशिम मुल्ला, जावेद मुल्ला, मोहम्मद शेख, वसीम पठाण, जाकीर मुल्ला, जाफर शेख, इनुस शेख इत्यादी व्यक्तीने परिश्रम घेतले.


