प्रस्थापितशाहीला पर्याय म्हणून ऍड.शीतल चव्हाण यांच्या नावाची चर्चा ; उमरगा नगराध्यक्ष पद; साद, पडसाद. जिल्ह्याच्या व तालुक्याच्या राजकारणावर मुळजचाच वरचष्मा

0
111

मागच्या सात-आठ वर्षांपासून ऍड. शीतल चव्हाण हे नाव सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक अशा सर्व क्षेत्रात उमरगा – लोहारा भागात ठळकपणे दिसून येत आहे. त्यांच्या प्रसिद्धीचा, चाहत्यांचा व जनतेवरील प्रभावाचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे.विद्यार्थी दशेत डाव्या-पुरोगामी चळवळीत सक्रिय असणाऱ्या व माडजच्या कॉ. रामराव गायकवाड यांच्या कम्यूनिस्ट विचारांचा वारसा लाभलेल्या ऍड. शीतल चव्हाण यांनी आपल्या कार्याचा आवाका वाढवत व सर्वसामावेशक भूमिका घेत आपल्या व्यक्तिमत्वात व्यापकता आणली. त्यांनी पुणे येथे LL.M चे शिक्षण पूर्ण करून आपल्या गावाकडे, आपल्या मातीतल्या लोकांकडे लक्ष देत उमरगा-लोहारा भागात वाचनालयाची चळवळ उभी केली. उमरगा शहरात “पान टपरी नव्हे ज्ञान टपरी” हे ब्रीद घेऊन “वाचन टपरी” सुरु केली. तसेच हेअर सलून व ‘टी-स्टॉल’वर ‘वाचन कट्टे’ सुरु केले. पुस्तक पालखी, ग्रंथ दिंडी, पुस्तक गुढी, पुस्तक वाचणारा गणपती, मकर संक्रातीला पुस्तकाचे वाण, विवेक यात्रा, ग्रंथ तुला, विचारांची रथ यात्रा, संविधान जागर यात्रा, विद्यार्थ्यांसाठी निबंध व वादविवाद स्पर्धा हे त्यांचे अनोखे, नावीण्यपूर्ण उपक्रम परिसरात, राज्यात व देशात प्रेरणा देणारे ठरले. त्यांच्या उपक्रमाने त्यांचेच नव्हे तर उमरगा परिसराचे नाव राज्यात व देशात गौरवले गेले. असे असले तरी त्यांचे काम केवळ वाचन संस्कृती रुजवन्यापुरते मर्यादित नाही. या माध्यमातून विचारी, जागरूक नागरिक तयार व्हावेत व त्यांनी समतामूलक समाज निर्माण करावा हा त्यांचा मुख्य हेतू आहे. त्यासाठी राजकारणाकडे ते साधन म्हणून पाहतात. ऍड. शीतल चव्हाण यांनी त्यांच्या मोजक्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन कोरोना काळात रुग्णांना फळ, अंडी, केळी, खजूर वाटप करणे तसेच गावोगावी मास्क, सॅनिटायजरचे वाटप करून जनजागृती घडवून आणणे, कोरोना सेंटर्ससोबत समन्वय ठेवून सहाय्यता कक्ष चालवणे, आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान करणे तसेच शासन, प्रशासनाचे जनतेच्या समस्यांवर लक्ष वेधण्याचे महत्वपूर्ण काम केलेले आहे.उमरगा शहरातील पाणीपुरवठा, वीज वितरण, वाहतूक समस्या, रस्ते, गटार, स्वच्छता, पथदिवे, निकृष्ट कामे अशा सर्व बाबतीत जनकेंद्री भूमिका घेत आवाज उठवला व महत्वाचे योगदान दिले आहे. त्यांच्या फाउंडेशनमार्फत मुळज रोडवर ऐन रस्त्यावर पडलेल्या खड्यात उतरुन केलेले आंदोलन व शहरातील मौलाना आझाद चौकात असलेल्या पोलवर बल्ब नसल्याने उंच पोलावर क्रेन लावून मेणबत्या पेटवलेले आंदोलन खास लक्षवेधी ठरले, त्याला यशही आले.उमरगा शहरात फेरीवाले व गाड्यावाल्याना नगर परिषदेने कर वाढवला तेव्हा निवेदन देऊन व आंदोलनाचा इशारा देऊन कर कमी करून घेण्याचे काम असो की खाटीक समाजाच्या समस्यांना वाचा फोडून त्यावर उपाययोजना आखन्याचे काम असो, ऍड. शीतल चव्हाण फाउंडेशन अग्रेसर राहिली.शहरात महिलांसाठी स्वतंत्र शौचालयाची मागणी असो की वाढत्या गुन्हेगारीविरोधात आवाज उठवणे असो, सर्वप्रथम पुढाकार शीतल चव्हाण व त्यांच्या फाउंडेशननेच घेतला. शीतल चव्हाण यांनी “लॉयर्स असोसियशन फॉर जस्टीस” या नावाने उमरगा शहरात विधी सहाय्यता व सल्ला केंद्र सुरु केले आहे. या केंद्रामार्फत गरजू व पीडित व्यक्तीना कोर्ट-कचेऱ्याच्या कामात मदत केली जाते. याशिवाय शीतल चव्हाण यांनी रोजगार मेळावे, क्रिडेला प्रोत्साहन देणारे उपक्रम, आरोग्य विषयक भरीव कार्यदेखील केले आहे.दरवर्षी पत्रकार दिनाला पत्रकारांचा सन्मान करण्याची व विविध क्षेत्रातील मान्यवराना पुरस्कार देऊन गौरवण्याची परंपरा शीतल चव्हाण यांनी सुरु केली. यंदाच्या दसऱ्याला दरवर्षी निघणाऱ्या विचारांच्या विवेक यात्रेत त्यांनी अतिवृष्टीग्रस्तासाठी मदत गोळा केली व ती गरजू लोकांपर्यत पोचवली.शीतल चव्हाण हे कार्यकुशल व्यक्तिमत्व तर आहेच पण त्याचसोबत ते पट्टीचे वक्ते, लेखक, कवी, गायक व कलेची जाण असणारे रसिक व्यक्ती आहेत. त्यांनी जागर, मंथन, कॉम्रेड (कवितासंग्रह), मी वाचलेली उमरग्यातील माणसं या प्रकाशित साहित्यासह सोशल मीडियावर विपूल लिखाण केले आहे. महामानवांच्या विचारावरील त्यांची भाषणे व विश्लेषणात्मक, अभ्यासू लिखाण उमरगा परिसरासह राज्यभर गाजले आहे.सध्या उमरगा नगर परिषदेच्या निवडनूकाचे बिगुल वाजले आहे. नगराध्यक्ष पद ‘ओपन’साठी सुटलेले असल्याने मातब्बर राजकीय कुटुंबातील अनेकांचे नाव या पदासाठी चर्चीले जात आहे. शीतल चव्हाण हे नेहमी प्रस्थापितशाही विरोधात रोखठोक भूमिका घेत आले आहेत.  प्रस्थापित कुटुंबातील उमेदवार उमरगा शहराच्या नगराध्यक्ष पदासाठी निवडनूकीच्या रिंगणात उतरले तर प्रस्थापितशाही विरुद्ध पर्याय देण्यासाठी म्हणून ऍड. शीतल चव्हाण मैदानात उतरतील अशी चर्चा त्यांच्या सहकाऱ्यांत व नागरिकांत होत आहे. ऍड. शीतल चव्हाण हे मूळचे मूळज गावचे आहेत. त्यांचे वडील प्रा. शामराव रघुनाथराव चव्हाण हे सिल्लोड येथे प्राध्यापक होते. त्यांच्या अकाली निधनानंतर चव्हाण कुटुंबिय उमरगा शहरात स्थायिक झाले. ऍड. शीतल चव्हाण यांचे 12 वी पर्यंतचे शिक्षण उमरग्यातच झाले. त्यांच्या सामाजिक, राजकीय कार्याची उमरगा हीच भूमी आहे. शीतल चव्हाण यांच्या सामाजिक, राजकीय प्रभावामूळे आधीच जिल्ह्याचा राजकीय केंद्रबिंदू असलेले मूळज हे गाव त्यांच्या राजकीय एन्ट्री ने अजून आधीरेखित होणार आहे आणि काहीही झाले तरी शेवटी ‘मुळज’चाच वरचष्मा राहणार असल्याचे नागरिकांत बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here