येळी गावाजवळ अपघात; एकाचा मृत्यू ,एक गंभीर जखमी 

0
324

उमरगा :- तालुक्यातील मुंबई – हैदराबाद महामार्गावरील येळी गावाजवळ ट्रक व आयशर चा  अपघात होऊन एकाचा जागीच मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना दि. 16 रोजी घडली आहे.

सविस्तर वृत्त मुंबई – हैद्राबाद महामार्गावरील येळी गावाजवळ ट्रक व आयशरच्या अपघात दोन गंभीर जखमी परंतु डॉक्टराने तपासणी करून चालकास मयत घोषीत केले.दि. 16 रोजी सकाळी ठीक 10:50 वाजता येळी गावाजवळ नादुरुस्त थांबलेली ट्रक क्रमांक K A 56 2382 ला पाठीमागून येणाऱ्या आयसर क्रमांक M H 04 CV 8903 ने जोराची धडक दिली त्यात दोघे गंभीर जखमी झाले . सदाशिव दादाराव मंगे, वय – 45, रा. लाडवंती, ता. बस्वकल्याण  यांचा मृत्यू झाला,तर सरस्वती बाबुगोळ वय 63 रा. कोहीनूर वाडी ता. बस्वकल्याण  ह्या गंभीर जखमी झाल्या आहेत.

सदर अपघाताची माहिती मिळताच उमरगा चौरस्ता येथील जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य  महाराज संस्थान नाणिज धाम ची रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जखमीला उप जिल्हा रुग्णालय उमरगा येथे दाखल केले असल्याची माहिती रुग्णवाहिका चालक शेषराव लवटे यांनी दिली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here