उमरगा:– तालुक्यातील पेठ सांगवी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सभामंडपाकरीता स्थानिक विकास निधी अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा आमदार प्रवीण स्वामी यांच्या हस्ते दि.23 रोजी सायंकाळी संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय युवक काँग्रेसचे सचिव,तथा स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष महेश देशमुख यांनी केले होते.याप्रसंगी शिवसेनेचे युवा नेते अजिंक्य (बापू) पाटील, उमरगा कृषी उत्पन्न बाजार समिती चे माजी सभापती नानाभाऊ भोसले, पुणे महानगरपालिका चे माजी अभियंता एस.के.सुरवसे, माजी पंचायत समिती सदस्य विजयाताई देशमुख,पेठ सांगवी चे सरपंच कौसर मुजावर, उपसरपंच सिराज शेख, आदी मान्यवर उपस्थित होते.
विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सभामंडपा करीता स्थानिक विकास निधी अंतर्गत निधी मंजूर करण्यात आला असून, दि.23 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास सभा मंडपाच्या बांधकामाचे भूमिपूजन आमदार प्रवीण स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाला पेठ सांगवी ग्रामपंचायत चे सर्व सदस्य , विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन हरीभाऊ भोसले, युवक काँग्रेस ग्रामीण चे जिल्हाध्यक्ष गणेश पवार, तालुकाध्यक्ष हणमंत सांगवे, पोलीस पाटील ईश्वर सुरवसे, तंटामुक्ती अध्यक्ष अमर यमगर,शालेय समितीचे माजी अध्यक्ष अहमद तांबोळी, कवठा ग्रामपंचायत चे सदस्य चंद्रकांत उर्फ पिंटू जाधव, शंभूराजे देशमुख , तसेच गावातील प्रतिष्ठीत मान्यवर, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केशव सरवदे, यांनी तर प्रस्ताविक माजी अभियंता एस.के.सुरवसे, यांनी तर आभार उमेश सुरवसे यांनी मानले.


