‘स्वामी विवेकानंद व महात्मा बसवेश्वर’ मधील रंगला २००१ बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

0
98

उमरगा :– शहरातील स्वामी विवेकानंद व श्री महात्मा बसवेश्वर येथील दहावीच्या २००१ बॅचचे स्नेह मेळावा  दि.२५ रोजी थाटात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवातीस सहकारी मयत झालेल्या मित्रांना श्रद्धांजली वाहण्यात आली. जुन्या मित्र मैत्रिणींना भेटल्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. २४ वर्षांनी भेटल्यानंतर अनेकांचे चेहरेही एकमेकांना आठवत नव्हते. स्नेहमेळाव्यात मित्र मैत्रिणींनी एकमेकांशी मनमुराद गप्पा मारल्या, एकमेकांच्या सुख-दुःखांविषयी, परिवार,कामकाज व सध्या आपल्या आयुष्यात काय चालले आहे, हे सांगत गप्पा रंगल्या. व्यासपीठावर जाऊन सर्वांनी आपला परिचय करुन दिला. त्यातून जुन्या आठवणी जाग्या झाल्या.सर्व विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व फेटा प्रदान करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्नेहल टिकांबरे, भाग्यश्री लोकरे विश्वनाथ सुर्यवंशी गजानन तळभोगे यांच्यासह वर्गमित्र मैत्रीणींनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा सुदर्शन तपसाळे यांनी अध्यक्षीय समारोपातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सुत्रसंचलन ज्योती बजाज यांनी केले. किशोर मुळे सचिन भोसले यांनी आभार मानले. प्रस्ताविक शैलेंद्र गायकवाड यांनी केले यावेळी विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.शेवटी पुढच्या वर्षी असा मेळावा घेण्याचे ठरवून एकमेकांनी निरोप घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here