उमरगा : भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखान्याची उभारणी अत्यंत संघर्षातून झाली असली तरी मागील आठ वर्षात भाऊसाहेब बिराजदार कारखान्याने दिलेला सर्वाधिक दर व वेळेवर मिळालेला हप्ता यामुळे परिसरातील व जिल्ह्यातील कारखान्यांना याच धर्तीवर भाव व हप्ता द्यावा लागत असल्याने भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखाना ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला आहे .असे समुद्राळ येथील भाऊसाहेब बिराजदार कारखाना , क्युनर्जी इंडस्ट्रीज लि. च्या दि . २७ रोजी आयोजित कारखान्याच्या आठव्या गाळपं हंगाम शुभारंभ प्रसंगी उद्घाटन पर भाषणात प्रा सुरेश बिराजदार यांनी मत व्यक्त केले . मोळी व गव्हाण पूजन माणिकराव बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आले .तर काटा पूजन विविध गावातील शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी कारखान्याचे संचालक सुनिल माने ,साहेबराव पाटील, गोविंदराव साळुंके , युवराज पाटील , इमाम पटेल ,आर.डी माने , यांच्यासह अशोक कारभारी , सुनील साळुंखे ,शमशोद्दीन जमादार, रमेश बिराजदार , सुभाष गायकवाड ,मारुती पाटील,भीमा स्वामी , अमर बिराजदार ,रामकृष्ण बिराजदार, प्रकाश सुभेदार ,कवलजीत बिराजदार,राऊ भोसले , गोजरबाई बनसोडे,योगीराज स्वामी, आदींची प्रमुख उपस्थिती होती . ऊस उत्पादक व सभासदांचा ऊस संपेपर्यंत कारखान्याचा गळीत हंगाम सुरू राहिल, शेतकऱ्यांना योग्य दरासह वेळेत हप्ता दिला जाईल .कारखान्यात इथेनॉल निर्मिती ,विद्युत निर्मिती यासह अद्ययावत यंत्रणा उभारण्यात आली आहे .ऊस वाहतुक व तोडणी यंत्रणा व हार्वेस्टर यंत्र मोठ्या प्रमाणात करार करण्यात आले आहेत .कारखान्याला जास्तीत जास्त व चांगल्या प्रतीचा ऊस मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सभासदांनी पुरवठा करावा .असे आवाहनही त्यांनी यावेळी केले . यावेळी गहिनीनाथ कोकाटे ,संजय जाधव ,किसन जाधव,आयुब इनामदार,सत्यनारायण जाधव , प्रदीप पाटील , माधवराव पाटील , प्रताप महाराज ,प्रदीप गावकरी ,विष्णू भगत, जालिंदर कोकणे ,बाबा शेख , प्रकाश भगत , जीवन जाधव ,मुरली पाटील , रणजीत बिराजदार, फैय्याज पठाण , कृष्णा मदनसुरे, अमोल खोंडे ,किशोर औरादे , ज्योतीराम औरादे ,बालाजी साळुंखे ,विजय पाटील ,राजेंद्र पाटील ,किशोर जाधव ,चंद्रहार्ष बनसोडे,काशिनाथ गायकवाड ,पवन पाटील, यांच्यासह क्युनर्जी इंडस्ट्रीज चे जनरल मॅनेजर पाटील बि .जे . ,चिफ इंजिनिअर राहुल मेरगळ ,मुख्य शेती अधिकारी शेंडगे रामचंद्र,त्रिगुळे सुरेश,बिराजदार ज्ञानेश्वर ,चिफ केमिस्ट पांढरे सुरज, डिस्टलरी मॅनेजर कोळगे ज्ञानेश्वर यांच्यासह परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते .


