भारतीय बौध्द महासभा तालुकाध्यक्षपदी उमेश सुरवसे; सरचिटणीसपदी संगीता सोनकांबळे

0
184

उमरगा :– शहरातील शासकीय विश्रामगृह येथे दि.26 रोजी करण्यात आलेल्या बैठकीत भारतीय बौध्द महासभा तालुका कार्यकारिणीची निवड प्रक्रिया संपन्न झाली. या वेळी तालुकाध्यक्षपदी उमेश सुरवसे तर सरचिटणीसपदी संगीता सोनकांबळे यांची निवड करण्यात आली.भारतीय बौध्द महासभाचे राष्ट्रीय अध्यक्ष डाॅ.हरिश रावलिया,कार्याध्यक्ष डॉ भिमराव आंबेडकर,राष्ट्रीय संरक्षक मिराताई आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शाखा धाराशिव दक्षिण अंतर्गत दि.26 रोजी शासकीय विश्रामगृह येथे जिल्हाध्यक्ष राजश्री कदम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार‌ पडली. यावेळी उमरगा तालूका कार्यकारणी निवड बहुमताने करण्यात आली.तालुकाध्यक्ष पदी उमेश सुरवसे यांची तर सरचिटणीस संगीताताई सोनकांबळे,कोषाध्यक्ष सोनाली कांबळे,उपाध्यक्ष तातेराव मादळे,सचिव नवनार गायकवाड,सचिव आदित्य कांबळे, महिला उपाध्यक्ष पदी लताबाई कोल्हे,आदिसह उषाबाई गायकवाड,संगीता गायकवाड,बालाजी सुर्यवंशी,लिंबाजी गायकवाड,विशाल सोमवंशी,किरण कांबळे,राजेंद्र सुरवसे,हणमंत कांबळे,लक्ष्मीबाई गायकवाड,सिद्राम भोसले

आदींची नूतन कार्यकारणीवर निवड करून निवडीचे पत्र देण्यात आले.यावेळी नुतन कार्यकारिणीस जिल्हा सरचिटणीस विजय बनसोडे,पर्यटन उपाध्यक्ष विश्वासभाऊ पंडागळे,कुशिद्र सोनकांबळे व वंचित बहुजन आघाडीचे नेते राम भाऊ गायकवाड,दत्ता भाऊ गायकवाड,बालाजी गायकवाड यांनी सर्व कार्यकारणीस शुभेच्छ्या दिल्या.यावेळी आनंद कांबळे,अनिता कांबळे,तुळसाबाई गायकवाड,राजाबाई कांबळे,लखन कांबळे ,संतोष सुरवसे,अनंत कांबळे,निखिल गायकवाड,जिवन सुर्यवंशी,अविनाश भालेराव,उध्दव गायकवाड आदिसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here