आगामी निवडणुका राष्ट्रवादी विकासाच्या मुद्द्यावर लढणार – प्रा .सुरेश बिराजदार

0
89

उमरगा : येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विकासाच्या मुद्द्यावर लढणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा सुरेश दाजी बिराजदार यांनी बलसुर येथे झालेल्या उमरगा लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दि .२८ रोजी पार पडलेल्या आढावा बैठकीत बोलताना व्यक्त केले .यावेळी राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष दिग्विजय शिंदे,उमरगा तालुकाध्यक्ष बाबा जाफरी,लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंके ,जिल्हा उपाध्यक्ष भीमा स्वामी, अशोक कारभारी ,दत्ता इंगळे ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नेताजी कवठे , सुभाष गायकवाड , मारुती पाटील ,लोहाऱ्याचे माजी उपनगराध्यक्ष अयुब शेख,युवक जिल्हा सरचिटणीस शमशोद्दीन जमादार, युवक विधानसभा अध्यक्ष बाबा पवार ,युवक शहराध्यक्ष सुशील दळगडे ,उमरगा शहराध्यक्ष शंतनू सगर ,महिला तालुकाध्यक्ष राऊताई भोसले ,बंजारा सेल जिल्हा उपाध्यक्ष प्रताप राठोड आदींची प्रमुख उपस्थिती होती .    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे झाली असुन मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे .उमरगा लोहारा तालुक्यातविविध विकास कामे रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात विकास निधी आला आहे . लाडकी बहीण, अतिवृष्टीचे शेतकऱ्यांना अनुदान ,धाराशिव जिल्ह्यातील बानगंगा व भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखाने चालू करून जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक दर मिळवून दिला .राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारावर चालणारा पक्ष आहे .जातीपातीचे राजकारण न करता फक्त सर्वांगीण विकास हे ध्येय ठेवून आम्ही काम करतो . आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आम्ही केलेल्या विकास कामांच्या जोरावर आणि विकासासाठीच आम्ही मत मागणार आहोत .राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महायुतीत असुन महायुती म्हणूनच आम्ही निवडणूकीस सामोरे जाऊ .परंतु अन्य कारणाने वेगवेगळे लढण्याची गरज भासल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तयार राहावेअसे  बिराजदार यांनी बोलताना मत व्यक्त केले .या बैठकीत लहुजी शक्ती सेनेचे उमरगा तालुका अध्यक्ष राम कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला .   यावेळी प्रकाशसिंह सुभेदार ,गोजरताई बनसोडे ,संजय जाधव, भरत बिराजदार,प्रताप महाराज ,अमोल ओवंडकर ,संदिपान पाटील,मोहन शिंदे ,रणजीत गायकवाड ,आदित्य पवार ,अजिंक्य पवार,श्रीराम जगदाळे,रवी पाटील ,अजित पाटील,पवन पाटील,किशोर जाधव ,राहुल बनसोडे ,अप्पू हिप्परगे,बाळू फरताळे,राम शिंदे ,फैयाज पठाण ,सलमान सवार , अजित जाधव ,कविता घोडके , पंचशीला कांबळे ,किसन पवार,प्रदीप पाटील ,प्रदीप गावकरी ,आयुब शेख ,राजू तुरोरीकर,अण्णाप्पा लामजणे ,ज्योतीराम औरादे ,पंचप्पा बोंडगे,चंद्रहार्ष बनसोडे ,अभय पाटील ,विजय पाटील,रणजीत बिराजदार,सुरज भोसले ,धनराज जाधव ,गुरुलिंग वाकडे ,कृष्णा मदनसुरे, अमोल खोंडे ,नंदू बिराजदार,दिनकर पवार , रामलिंग औटी,आदी सह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here