नाईचाकूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील 122 जणांची विविध कर्करोगाची तपासणी

0
127

उमरगा:- तालुक्यातील नाईचाकूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र नाईचाकूर येथे कार्यक्षेत्रातील सर्व संशयित मुख कर्करोग, स्तनाचा कर्करोग, गर्भपिशवीचा कर्करोग, अशा संशयित रुग्णांची जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या कॅन्सर वॅन द्वारे 122 रुग्णाची तपासणी दि.01 रोजी करण्यात आली.याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतिश हरिदास, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमाकांत बिराजदार,वैद्यकीय अधिकारी डॉ. नूर चिद्रे ,स्त्रीरोग तज्ञ डॉ. तांबोळी,दंत चिकिस्तक डॉ. स्वप्नाली लामतुरे, अधिपरिचारिका अश्विनी केंद्रे, औषध निर्माण अधिकारी अमृता पाटील, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी विकास दाजी सूर्यवंशी , शुभांगी स्वामी आरोग्य सहाय्यिका, बाळासाहेब जाधव, काजल जाधव, आरोग्य सेविका ,आरोग्य सेवक, मिलिंद पाटील, विजू ठाकूर वाहन चालक, शिवशंकर कांबळे कॅन्सर वाहन चालक प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, बीएफ सर्व आशा कार्यकर्ती आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here