शिवाई शैक्षणिक संकुलात औषध सुरक्षा सप्ताह संपन्न
उमरगा:– तालुक्यातील कोरेगाव वाडी येथील शिवाई चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शिवाई इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग, या शैक्षणिक संकुलात औषध सुरक्षा सप्ताह दि.9 रोजी संपन्न झाला. याप्रसंगी प्राचार्य महेश कदारे यांनी औषध सुरक्षाविषयी मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बी.एच.बेडदुर्गे, सचिव डॉ.विजय बेडदुर्गे, उपाध्यक्ष प्रा.अजय बेडदुर्गे यांची उपस्थिती होती.

महाराष्ट्र राज्य औषध परिषद, मुंबई अंतर्गत 3 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर औषध सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा केला जातोय. या अनुषंगाने मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले. औषध ही जीवन संजीवनी आहेत. परंतु त्याबरोबरच औषधांचे योग्य पद्धतीने सेवन करणे गरजेचे असल्याचे प्राचार्य महेश कदारे म्हणाले. रुग्णाचे वय, लिंग, लक्षणे तसेच डॉक्टरांच्या सल्यावरूनच औषधे घ्यावीत. औषधे घेत असताना औषधांची वैधता, पॅकिंग तपासावी. योग्य ठिकाणी, योग तापमानात साठवण करावी.दुसऱ्याची औषधे सेवन करू नयेत. काही अडचणी असल्यास फार्मासिस्टची मदत घ्यावी. काही तक्रार असल्यास हेल्पलाईन नंबर वर कॉल करावा असे प्राचार्य महेश कदारे म्हणाले. तसेच औषध सुरक्षा प्रतिज्ञा घेण्यात आली.प्राचार्य अल्वीन काळे, प्रा.डॉ.स्नेहल धर्माधिकारी,प्रा.प्रशांत वाघमारे, प्रा. शुभम सूर्यवंशी, प्रा.अभिजीत पाटील, प्रा.शहाबाज शेख, प्रा.प्रियंका राठोड, प्रा.शुभांगी बंदीचोडे, प्रा.किशोर जाधवर व महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.


