जकेकूर चौरस्ता परीसरात अवैधरित्या वेश्याव्यवसाय चालवणा-या एका लाॅजवर उमरगा पोलीसांची कारवाई 

0
610

उमरगा :-  शहरापासून हकेच्या अंतरावर असलेल्या जकेकूर चौरस्ता परीसरात मागील काही दिवसांपासून अवैधरित्या वेश्याव्यवसाय चालवणा-या एका लाॅजवर उमरगा पोलीसांनी दि.9 रोजी रात्री 11.30 ते 12.00 वाजण्याच्या सुमारास कारवाई केली असून,या कारवाईत एक महिले सह लाॅजच्या मॅनेजर ला अटक करून दि.10 रोजी 3.52 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी विरुध्द कलम 3, 4, 5 अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा 1956 सह कलम 143, 144 भा. न्या. सं. 2023 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उमरगा पोलीस ठाणे येथे सद्या कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग कन्हेरे यांच्या फिर्याद जबाब वरुन वरील प्रमाणे गुन्हा दाखल करुन पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रल्हाद सुर्यवंशी  यांच्याकडे देण्यात आला आहे.अशी माहिती उमरगा पोलीस यांच्या मार्फत देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here