उमरगा:– तालुक्यातील कोरेगाव वाडी येथील शिवाई चॅरिटेबल ट्रस्ट संचालित शिवाई इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग बी.एस्सी. नर्सिंग च्या विद्यार्थ्यांनी विविध विषयावरती दि.10 रोजी प्रोजेक्ट सादरीकरण केले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बी.एच बेडदुर्गे, संस्थेचे सचिव डॉ विजय बेडदुर्गे, संस्थेचे उपाध्यक्ष, प्रा. अजय बेडदुर्गे, प्राचार्य अलविन काळे, डॉ. स्नेहल धर्माधिकारी, उपस्थित होते. प्रोजेक्ट सादरीकरण च्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये वैद्यकीय आणि नर्सिंग क्षेत्रातील तांत्रिक ज्ञान, आपत्ती परिस्थितीतील कार्यक्षमता तसेच व्यावसायिक जबाबदारीबद्दल जागरूकता निर्माण करणे हा उद्देश होता.विद्यार्थ्यांनी आपल्या प्रेझेंटेशनमध्ये विविध विषयांवर उत्कृष्ट माहिती सादर केली. या विषयांमध्ये आपत्ती व्यवस्थापन (Disaster Management ) मानवी जीवन जगत असताना, अचानक येणाऱ्या भूकंप, सुनामी, अतिवृष्टी, आपत्तीला कसे सामोरे जायचे, त्याचे व्यवस्थापन, झालेले नुकसान त्याचे नियोजन कसे करायचे या सादरीकरणातून सांगण्यात आले , ए.सी.एल.एस. मॉड्युल (ACLS Module), आय.सी.यू.चे आवश्यक घटक (Requisites of ICU), व्यवसायिक अपाय (Occupational Hazards ) व्यावसायिक अपाय, अपंगत्व, त्वचा, डोळे, कान, नाक, मेंदू. यावरती असंख्य मानवी जीवनामध्ये अपाय होत असतात, त्यावरती प्रतिबंध घालण्यासाठी सादरीकरणनाद्वारे, जनजागृतीचा संदेश देण्यात आला आणि कॅन्सर निदानातील विविध तपासण्या (Diagnostic Tests in Cancer Detection) याचे सादरीकरण करण्यात आले . प्रत्येक गटाने आपल्या विषयाचे सखोल अध्ययन करून आकर्षक पोस्टर, मॉडेल्स आणि सादरीकरणाच्या माध्यमातून प्रेक्षकांना माहिती दिली.या सत्रात विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास, तयारी आणि विषयावरील पकड दाखवून दिली. प्रेझेंटेशनदरम्यान झालेल्या प्रश्नोत्तर सत्राने वातावरण अधिकच उत्साही बनवले. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी शिक्षणात्मक तसेच प्रेरणादायी ठरला.अशा प्रकारचे शैक्षणिक उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात, असे मत प्राचार्य ऑल्विन काळे व्यक्त केले. यावेळी प्राचार्य.अल्वीन काळे, प्रा. डॉ.स्नेहल धर्माधिकारी, प्रा. प्रशांत वाघमारे प्रा.शुभम सूर्यवंशी, प्रा.प्रियंका राठोड प्रा.अभिजीत पाटील, प्रा.शहाबाज शेख , प्रा.शुभांगी बंदीचोडे, प्रा.किशोर जाधवर , व महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. अभिजित पाटील यांनी केले.


