उमरगा – तालुक्यातील येळी येथे नव्याने बांधण्यात येणाऱ्या बौद्ध विहाराचा भूमिपूजन उदघाट्न सोहळा दि 10 रोजी शिवसेना उपनेते ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष कैलास शिंदे, मा. सभापती हरिष डावरे, वंचित बहुजन आघाडीचे रामभाऊ गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी भंते धम्मसार थेरो, भंते सुमेध नागसेन, भंते सुमंगल यांनी त्रिसरण पंचशील घेत उपस्थितांना शुभाशीर्वाद दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हरिष डावरे होते. यावेळी शिवसेना उपनेते ज्ञानराज चौगुले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत युवकांनी उत्तम शिक्षण घ्यावे, जीवनात यशस्वी व्हावे. असे युवकांना आवाहन केले. यावेळी कैलास शिंदे, हरिष डावरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच निवृत्ती पवार, ग्रामसेवक एस.आर. पांढरे, मा.सरपंच शिवलिंग माळी, वैशाली बुद्ध विहार ट्रस्ट चे पदाधिकारी, उपासक, उपासिका ग्रामस्थ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद कांबळे यांनी, प्रास्ताविक अजय कांबळे यांनी तर आभार विनायक कांबळे यांनी मानले.


