तुळजापूर तालुक्यात राजकीय भुकंप ; अशोक भाऊ जगदाळे यांचा काँग्रेस  पक्षात प्रवेश

0
121

 

नळदुर्ग :- या ऐतिहासिक शहरात इतिहास घडणार नळदुर्ग नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ या पंच वार्षिक साठी नळदुर्ग शहराला दमदार नगराध्यक्ष मिळणार यामुळे नळदुर्ग शहरात उत्सहाचे वातावरण आहे .नळदुर्ग नगर परिषदेच्या निवडणूका व राजकीय घडामोडी पुर्ण बदलेल्या दिसुन येतात नळदुर्ग शहराचे सुपुत्र तथा दृष्टी समुहाचे मुख्य प्रवर्तक अशोक [ भाऊ ] जगदाळे यांनी तर राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करून काँग्रेस पक्षाला खुप मोठे बळ मिळाले आहे आणि नळदुर्ग शहरात मोठ्या प्रमाणात या प्रवेशाच्या चर्चा रंगल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस [ शरदचंद्र पवार ] गटाचे पक्षाचे नेते  अशोक भाऊ जगदाळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस [ शरदचंद्र पवार ] गटाला राम राम ठोकत चक्क राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि शहराचे समीकरण बदलले कारण नळदुर्ग शहरात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची जोरदार तयारी सुरू झाली आसून यामध्ये अशोक भाऊ जगदाळे यांनी अचानक पणे खुप मोठा राजकीय भुकंप केला आणि तुळजापूर तालुका हदरून गेला अशोक भाऊ जगदाळे यांच्या प्रवेशामुळे नव यूवकाना नवचैतन्य व उर्जा निर्माण मिळाली आहे . प्रेरणा मिळणार आहे कार्यकर्त्यां मध्ये उत्साहाचे वातावरण झाले आसुन नेते अशोक [ भाऊ ] जगदाळे यांनी निवडणुकीचे रणसिंग फुंकले आहे .आता कोण बाजी मारणार नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर कोण बसणार हे पाहायचे आहे .नळदुर्ग नगर परिषदेची निवडणूक आटी तटीची होणार आसल्याचे संकेत मिळत आहे स्थानिक पातळीवर जमीनीवर राहून कोणत्या उमेदवाराने किती लोकांचे कामे केलीत हे ही जनता पाहाणार आहे कोण त्या नगराध्यक्ष पदाच्या लायकीचे आहेत वार्ड निहाय उमेदवार कोण किती कामे करतात जनता त्याला किंवा त्याच्या भुलथापाला बळी पडणार का ? का निस्वार्थ आणि कुठल्याही मदतीला धावून येणाऱ्या उमेदवारांना जनता नगर परिषद सभागृहात पाठवणार या कडे लक्ष केंद्रित झाले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here