उमरगा नगरपरिषद निवडणूक 2025 करीता तिसऱ्या दिवशी दोन महिला उमेदवारांचे अर्ज दाखल

0
377

उमरगा :- नगरपरिषद निवडणूक 2025 करीता दि.12 रोजी प्रभाग क्रं.9 मधून भाजप पक्षाचे महिला उमेदवार रिजवाना हारुन औटी यांनी तर प्रभाग क्रमांक- 1 मधून शिवसेना शिंदे गटाच्या महिला उमेदवार सुप्रिया प्रदीप घोडके यांनी  निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार गोविंद येरमे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांच्या कडे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.आतापर्यंत एकूण 4 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. याप्रसंगी भाजपाचे माजी नगरसेवक विक्रम म्हस्के, महेश माशाळकर तसेच प्रभागातील जेष्ठ मान्यवर उपस्थित होते.तर मुरूम नगरपालिका तिसऱ्या दिवशी निरांक राहिली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here