उमरगा:- नगरपरिषद निवडणूक 2025 करीता दि.10 रोजी पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून,दि. 13 रोजी चौथ्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी भाजपाचे युवा नेते हर्षवर्धन चालुक्य यांनी तर नगरसेवक पदासाठी बालाजी गणपती मस्के (प्रभाग क्रमांक 11 – काँग्रेस), बालाजी गणपती मस्के (प्रभाग क्रमांक 11- शिवसेना ठाकरे गट), अनिता तिप्पा बनसोडे (प्रभाग क्रमांक 11 अपक्ष) तर सचिन दिलीप जाधव (प्रभाग क्रमांक 2- शिवसेना शिंदे गट) यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार गोविंद येरमे व सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांच्या कडे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

शिवसेना शिंदे गटाच्या वतीने सचिन दिलीप जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी माजी खासदार रवींद्र गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.चौथ्या दिवशी अखेर पर्यंत नगराध्यक्षासाठी एक तर नगरसेवक पदासाठी ८ उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.


