उमरगा :- तालुक्यातील मुरुम नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीसाठी दि.14 रोजी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा भाजपचे जेष्ठ नेते बापूराव पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक निर्णय अधिकारी रणजितसिंह कोळेकर,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा वडेपल्ली यांच्या कडे उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शरण पाटील,लातूर येथील शिरीष आप्पा उटगे,भाजपचे मुरूम मंडळ अध्यक्ष गणेश अंबर,माजी नगराध्यक्ष रशीद शेख,धनराज मंगरुळे,गोविंद पाटील,गौस शेख,सुजित शेळके,श्रीकांत बेंडकाळे,राजू मुल्ला,आदींसह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.


