उमरगा : शहरातील न्यायालयाच्या इमारत समोर असलेल्या मलंग कॉम्प्लेक्स मधील तहसील कार्यालयाच्या सेतु सुविधा केंद्राच्या दुकानासह राघवेंद्र मल्टीसर्व्हीसेस ही दोन दुकाने पुर्ण तहा जळून खाक झाली असून,शेजारचे एक दुकान अर्धवट जळालेल्या अवस्थेत दिसून येत आहे. ही घटना दिनांक 15 रोजी राञी 11 वाजण्याच्या सुमारास घडली असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.शॉटसर्कीटमुळे व्यापा-यांचे खुप मोठ्याप्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. सविस्तर वृत , उमरगा शहरातील जिल्हा न्यायालयाच्या नविन इमारत समोर असलेल्या मलंग कॉम्प्लेक्स येथे तहसील कार्यालयाचे सेतु सुविधा केंद्र आहे. त्या लगतच इतर सर्व दुकाने असून दिनांक 15 रोजी रात्री कॉम्प्लेक्स मधील सर्व दुकाने बंद असताना शॉटसर्कीट मुळे सर्वप्रथम सेतु सुविधा केंद्र, त्यानंतर राघवेंद्र मल्टीसर्व्हीसेस ला आग लागून या दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. सेतु सुविधा केंद्रातील कम्प्युटर, प्रिंटर, शासनाचे महत्वाचे कागदपत्रे, यासह राघवेंद्र मधील अंदाजे तब्बल चार लाख रूपये किंमतीचे साहित्य जळून नष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच उमरगा नगरपरिषद ची अग्निशमन वाहन तातडीने घटनास्थळी दाखल होऊन आग विझविण्यासाठी अग्निशमन च्या जवानांनी पुर्ण ताकदीने प्रयत्न केल्यामुळे इतर दुकानात वाढत जाणारी आग आटोक्यात आणली. यावेळी शिंदेसेनेचे मराठवाडा निरीक्षक युवा नेते किरण गायकवाड, आमदार प्रवीण स्वामी, वंचीत बहुजन आघाडीचे नेते राम गायकवाड आदींनी घटनास्थळी पाहणी करून मदतकार्य केले. यावेळी उमरगा पोलिस कर्मचारी यांनी घटनास्थळी दाखल होऊन गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत केले.


