शिवाई शैक्षणिक संकुलात पालक मेळावा संपन्न 

0
92

 

उमरगा:- तालुक्यातील कोरेगाववाडी येथील शिवाई चॅरिटेबल ट्रस्ट संचलित कॉलेज ऑफ फार्मसी येथे दि. 15 रोजी पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता .कार्यक्रमाचे अध्यक्ष बी.एच. बेडदुर्गे, प्रमुख पाहुणे संस्थेचे सचिव डॉ. विजय बेडदुर्गे, उपाध्यक्ष प्रा.अजय बेडदुर्गे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्राचार्य महेश कदारे यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. महाविद्यालयात नियमित लेक्चर्स, प्रॅक्टिकल्स यास विशेष महत्व दिले जाते. त्याबरोबरच विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष दिले जाते. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच महाविद्यालयाचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. बी. फार्मसी विभाग प्रमुख प्रा. किरण पांचाळ व डी. फार्मसी विभाग प्रमुख प्रा.वैष्णवी फुगटे यांनी चालू शैक्षणिक वर्षाचा संभावित आराखडा सादर केला. उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते प्राचार्य महेश कदारे व प्रा. धनश्री भुजंगे लिखित ओव्हरव्हिव ऑफ फार्माकॉलोजी या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष बी.एच.बेडदुर्गे व सचिव डॉ.विजय बेडदुर्गे यांनी सर्व पालकांच्या प्रश्नावर मार्गदर्शन केले. प्रा.अजय बेडदुर्गे यांनी उपस्थित सर्व पालकांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.यावेळी प्राचार्य महेश कदारे, डॉ.अश्विनी सुर्यवंशी, प्रा.परीक्षित शिरूरे, प्रा. किरण पांचाळ, प्रा.अशोक गायकवाड, प्रा.श्रीकृष्ण मुळे, प्रा.अंकिता यादव, प्रा.धनश्री भुजंगे, प्रा. वैष्णवी फुगटे, प्रा.चनबस शेटगार, प्रा.मंजुषा गव्हाळे, प्रा.ओमकार पाटील, प्रा.किर्ती आर्य व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते. प्रा.धनश्री भुजंगे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here