उमरगा:- तालुक्यातील मुंबई – हैद्राबाद महामार्गावरील रामपुर पाटीजवळ दि. 18 रोजी दुचाकी वरुन खाली पडल्याने एक महीला जखमी झाल्याची घटना घडली आहे.सविस्तर वृत्त दिनांक 18 रोजी सकाळी 11:15 वाजता जगदाळ वाडी ते तुळजापूर जाणारी मोटारसायकल क्रमांक के.जे. 56 एल 4955 वरुन जात असता रामपुर पाटीजवळ मागे बसलेली सविता राम हक्के वय 30 राहणार जगदाळ वाडी तालुका उमरगा ही दुचाकी वरुन पडल्याने जखमी झाली आहे. सदर अपघाताची माहिती मिळताच उमरगा चौरस्ता येथील अपघातग्रसतांच्या मदतीला मोफत असलेली जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान ची रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जखमीला उप जिल्हा रुग्णालय उमरगा येथे दाखल केले. असल्याची माहिती रुग्णवाहिका चालक शेषेराव लवटे यांनी दिली आहे.


