अणदूर जवळ क्रूजरचं टायर फुटून अपघात ; 4 मयत, 5 गंभीर जखमी

0
600

तुळजापूर तालुक्यातील अणदूर नजीक शनिवारी दिनांक 22 रोजी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास क्रूजर जीपचं अचानक टायर फुटल्याने भीषण अपघात झाला असल्याची घटना घडली असून, प्रत्यक्षदर्शींनी च्या प्रथमीक माहिती नुसार या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 5 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

 

हा अपघात अणदूर येथील हॉटेल नॅशनल (उमरगा चिवरी पाटी) येथे घडला असून मृतांमध्ये ३ महिलांचा समावेश आहे. हे सर्व प्रवासी सोलापूर नजीकच्या कासेगाव-उळे येथील आहेत मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर-हैद्राबाद महामार्गावरून जाणारी एक क्रूझर जीप हॉटेल नॅशनल जवळ आली असता, अचानक गाडीचे टायर फुटले. यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटून हा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भयानक होता की, गाडीतील ३ महिला प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here