नगरपरिषद निवडणूकीच्या अनुषंगाने केंद्राध्यक्ष, मतदान अधिका-यांचे प्रशिक्षण संपन्न

0
81

उमरगा :- नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता नियुक्त करण्यात आलेल्या मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांचे दिनांक 24 नोव्हेंबर रोजी शहरातील अंतु बळी पतंगे सांस्कृतिक सभागृह, येथे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

 

प्रशिक्षण कार्यक्रमात तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद येरमे यांनी सर्वांना निवडणूक विषयक कामकाजाचे तपशीलवार मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, लक्ष्मण कुंभार, नायब तहसीलदार तथा अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, प्रविण कावरे, नायब तहसीलदार डॉ . अमित भारती, नायब तहसीलदार भीमाशंकर बेरूळे,यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रशिक्षण कार्यक्रमात निवडणुकीचे सर्वसाधारण माहिती, मतदान प्रक्रियेचे वेळापत्रक, मतदान प्रक्रिया दरम्यान विविध मतदान अधिकार्‍यांची जबाबदारी, भरावयाचे विविध फॉर्म, ईव्हीएम मशीन, इत्यादी बाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षण कार्यक्रमास एकूण 193 मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी उपस्थित तर , 11 कर्मचारी अनुपस्थित होते.अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here