उमरगा:– शेतकरी गटांना शाश्वत, तंत्रज्ञान आणि शास्त्रशुध्द शेतीकडे वळवून त्यांचे उत्पादन वाढवणे आणि उत्पादन खर्च कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत, यासाठी पाणी फाउंडेशन आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने फार्मर कप या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दि. 24 नोव्हेंबर रोजी शहरातील महादेव मंदिर येथील आनंद सभागृह, येथे कृषि विभाग महाराष्ट्र शासन, आत्मा व पाणी फाऊंडेशन यांचे संयुक्त विदयामाने उमरगा तालुकास्तरीय एकदिवसीय प्रशिक्षण आयोजीत करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमरगा चे तालुका कृषि अधिकारी ज्ञानोबा रितापुरे यांनी केले. उमरगा तालुक्यातील शेतकरी गटांनी या फार्मर कप स्पर्धेत सहभागी होण्याचे याप्रसंगी आवाहन केले. पाणी फाऊंडेशनतर्फे संस्थेचे वैभव सुरवसे, युवराज निंबाळकर, प्रतिक्षा आसबे यांनी शेतकरी गट संघटना, शेतकरी उत्पादक कंपनीचे महत्व व त्यांची कार्यपध्दती तसेच पाणी फाउंडेशनची वाटचाल व शेतीशाळेचे महत्व या मुदयावर सविस्तर मार्गदर्शन केले.पाणी फाउंडेशनतर्फे राबविण्यात येणा-या फार्मर कप या उपक्रमाची राज्यात व्याप्ती वाढविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुसार धाराशिव जिल्ह्यात देखील पाणी फाउंडेशन व कृषी विभागाच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी फार्मर कप ही स्पर्धा 2026 पासुन घेण्यात येणार आहे.फार्मर कप स्पर्धा म्हणजे गटशेतीला प्रोत्साहन देणे. यासाठी या गटशेतीमध्ये किमान ११ सदस्य आणि किमान १५ एकर जमीन क्षेत्र असणे आवश्यक आहे. हे निकष पूर्ण करणारा गटशेती गट सहभागीहोऊ शकतो. या स्पर्धेचा हेतू गट शेतीचे उत्पादन खर्च कमी करणे. मजुरीची बचत करणे, स्वस्तात खते व बियाणे,किटकनाशके यासारख्या कृषि निवीष्ठांची तसेच कृषि यंत्रे व औजारे उपलब्ध करण्याचा हेतू आहे.शेतकरी प्रशीक्षणादरम्यान. महेंद्रकर यांनी रब्बी हंगाम व्यवस्थापन मध्ये पेरणीपुर्वी जमनिधी पुर्वमशागत, बिज प्रक्रीया, बियाणे उगवण क्षमता तपासणी यांची माहिती सागीतली व अतुल गायकवाड, रमेश पाटील यांनी सदरील प्रात्यक्षीक करुन दाखवीले.सचिन पवार यांनी कृषि क्षेत्रातील अधुनीक तंत्रज्ञानाचा वापरातुन विवीध योजनांची माहिती व तंत्रज्ञानाविषयी सखोल माहिती जसे की, पिक सल्ला, मृदा अरोग्य पचौका, हवामानास अनुकुल शेती पध्दती, किड व रोग नियंत्रण बाजारभाव यासाठी महाविस्तार AI या अॅपबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.प्रशिक्षणाच्यावेळी तालुका कृषी अधिकारी डी बी रितापुरे, तसेच मंडळ कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी यांच्यासह, गटाचे प्रतिनीधी, शेतकरी उत्पादक कंपनी प्रतिनीधी, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प मधील कृषि ताई व युवा प्रशिक्षणार्थी सहभागी होते.पाणी फाउंडेशन फार्मर कप प्रशिक्षणाचे सुत्रसंचालन डिगंबर जाधव यांनी कैले तर आभार प्रदर्शन प्रविण पाटील यांनी केले.


