उमरगा – नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर उमरगा शहरात राजकीय वातावरण तापले असताना भाजपचे व मित्र पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार हर्षवर्धन शिवाजीराव चालुक्य यांनी सुरवातीपासून ते दि.३० तारखेपर्यंत डोर टू डोर प्रचाराच्या माध्यमातून तब्बल १२५ किमीचा विक्रमी प्रवास पूर्ण केला असून, त्यांचे विजयाची भक्कम बाजू मानली जात आहे.



शहरातील नागरिकांपर्यंत थेट जाऊन मतदारांशी संवाद साधत, त्यांच्या अडचणी जाणून घेत आणि भविष्यातील विकास आराखड्याची माहिती देत त्यांनी प्रचाराला विशेष गती दिली आहे.हर्षवर्धन चालुक्य यांनी मागील काही दिवसांपासून प्रभाग क्रमांक १ ते प्रभाग क्रमांक १२ पर्यंतचा डोर टू डोर प्रचाराचा प्रवास करत शहरातील प्रत्येक गल्ली, वाडा, घरे, दुकाने येथे जाऊन मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधत आहेत. नागरिकांच्या यावेळी मिळालेल्या प्रतिसादाने चांगली उत्सुकता निर्माण केली असून,अनेक ठिकाणी महिलां, तरुण, ज्येष्ठ नागरिक यांनी त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा दिल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे . त्यांच्या प्रचार पथकासोबत कार्यकर्त्यांची मोठी संख्या असून शिस्तबद्ध पद्धतीने डोर टू डोर प्रचार राबवण्यात येत आहे.शहराचा सर्वांगीण विकास, मूलभूत सुविधा, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्त्यांचे उत्तम नियोजन, आरोग्य व्यवस्था आणि युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही ते प्रचारादरम्यान प्रत्येक मतदारांना देत असल्याचे निदर्शनास येत असल्याची चर्चा मतदारांत सुरू आहे .अनेक ठिकाणी नागरिकांच्या समस्या ऐकून तातडीने निराकरणासाठी आवश्यक नोंदी स्वतः नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हर्षवर्धन चालुक्य घेत आहेत.भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीने या प्रवासाला विशेष उर्जा मिळाली असून, डोर टू डोर १२५ किमीचा प्रचाराचा हा प्रवास उमेदवारांच्या विजयात निर्णायक ठरू शकतो, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.उमरगा नगरपरिषद निवडणूक आता अंतिम टप्प्यात असून सर्वच पक्षांनी प्रचाराला वेग दिला आहे. दरम्यान हर्षवर्धन चालुक्य यांच्या प्रचाराच्या डोर टू डोर संपर्क मोहिमेमुळे प्रचाराला वेगळीच दिशा प्राप्त झाली असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. यामुळे मतदारांमध्ये त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.


