उमरगा:- राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांचेकडून दिनांक 29/11/2025 रोजी पत्रान्वये दिलेले निर्देश विचारात घेता, उमरगा नगरपरिषदेतुन प्रभाग क्र. 4 जागा क्र. (ब) (सर्वसाधारण), प्रभाग क्र. 5 जागा क्र. (अ) (आरक्षण-ना.मा.प्र. (महिला)), प्रभाग क्र. 11 जागा क्र. (अ) (आरक्षण अनुसूचित जाती) या जागांसाठी अतिरिक्त जिल्हा न्यायालय येथे अपील दाखल होते. परंतु अपीलाचा निकाल संबंधीत अतिरिक्त जिल्हा न्यायालयाकडून दिनांक 25/11/2025 रोजी म्हणजेच दिनांक 23/11/2025 किंवा तद्नंतर देण्यात आलेला आहे. त्यामुळे सदर सदस्य पदाच्या जागेची निवडणूक दिनांक 04/11/2025 रोजीच्या कार्यक्रमानुसार घेण्यात येणार नाहीत.

राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडून उमरगा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक-2025 चा कार्यक्रम दिनांक 04/11/2025 रोजी जाहीर झालेला आहे. या कार्यक्रमानुसार निवडणूकीची प्रक्रिया चालु आहे. राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांचेकडून दिनांक 29/11/2025 रोजी पत्रान्वये दिलेले निर्देश विचारात घेता, उमरगा नगरपरिषदेतुन प्रभाग क्र. 4 जागा क्र. (ब) (सर्वसाधारण), प्रभाग क्र. 5 जागा क्र. (अ) (आरक्षण-ना.मा.प्र. (महिला)), प्रभाग क्र. 11 जागा क्र. (अ) (आरक्षण अनुसूचित जाती) या जागांसाठी अतिरिक्त जिल्हा न्यायालय येथे अपील दाखल होते. परंतु अपीलाचा निकाल संबंधीत अतिरिक्त जिल्हा न्यायालयाकडून दिनांक 25/11/2025 रोजी म्हणजेच दिनांक 23/11/2025 किंवा तद्नंतर देण्यात आलेला आहे. त्यामुळे सदर सदस्य पदाच्या जागेची निवडणूक दिनांक 04/11/2025 रोजीच्या कार्यक्रमानुसार घेण्यात येणार नाहीत. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाचे दिनांक 29/11/2025 रोजीच्या पत्रासोबतचे परिशिष्ट-। प्रमाणे निवडणूकांसाठी सुधारीत निवडणूक कार्यक्रम 2025 प्रमाणे घेण्यात येणार आहे.तथापि अध्यक्ष व उर्वरीत 22 सदस्य साठीची निवडणूक प्रक्रिया राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचे कडील दिनांक 04/11/2025 कार्यक्रमानुसारच दिनांक 02/12/2025 रोजी मतदान होणार आहे.अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.


