Home क्राईम दुचाकी – इनोवा चा अपघात ; आई चा मृत्यू ,मुलगा गंभीर जखमी
- उमरगा:- तालुक्यातील लातूर – उमरगा रोडवरील नारंगवाडी पाटी जवळ दुचाकी – इनोवा चा अपघात होऊन सावळसूर येथील एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना दि. 3 रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. लातुर – उमरगा रोड वरुन सावळसूर येथून नारंगवाडीच्या दिशेने दि.3 रोजी जाणा- या दुचाकी क्रंमाक MH 25 J 5220 ला पाठीमागून येणाऱ्या इनोवा कार क्रमांक MH 12 XX 3713 ने जोराची धडक दिल्यानेदुचाकी वरुन प्रवास करणाऱ्या आई भिमाबाई गणपती बिराजदार वय 62 व प्रेमानाथ गणपती बिराजदार वय 45 राहणार सावळसुर हे गंभीर जखमी झाले. सदर अपघाताची माहिती मिळताच उमरगा चौरस्ता येथील अपघातग्रस्ताच्या मदतीला मोफत असलेली जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणीज धाम ची रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जखमीला उप जिल्हा रुग्णालय उमरगा येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी केले असता भिमाबाई गणपती बिराजदार यांना मृत घोषित केले तर गंभीर जखमी झालेल्या त्यांचा मुलगा प्रेमनाथ यास पुढील उपचाराकरीता दाखल करुन घेण्यात आले असल्याची माहिती रुग्णवाहिका चालक शेषेराव लवटे यांनी दिली.
error: Content is protected !!