उमरगा:- शहरापासून जवळच असलेल्या मुंबई – हैद्राबाद महामार्गावरील जकेकुर चौरस्त्याजवळ अज्ञात वहानाने टी. व्ही. एस. लुन्याला दि. 12 रोजी दुपारी 3.20 वा. धडक दिल्याने दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
सविस्तर वृत्त दिनांक 12 रोजी दुपारी ठिक 3:20 वाजता उमरगा येथुन सुंदरवाडी जाणाऱ्या लुना क्रमांक MH 25 A A 30 10 ला पाठीमागून येणाऱ्या अज्ञात कारने जोराची धडक देऊन वहान पसार झाले असता दोघे गंभीर जखमी झाले असून, अपघातात शाम लक्ष्मण गाडेकर वय 55 , कस्तुराबाई शाम गाडेकर वय 45 गंभीर जखमी झाले आहेत .दोघे ही सुंदरवाडीचे रहिवाशी आहेत. सदर अपघाताची माहिती मिळताच उमरगा चौरस्ता येथे अहोरात्र अपघात ग्रसताच्या मदतीला मोफत असलेली जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज संस्थान ची रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जखमीला उप जिल्हा रुग्णालय उमरगा येथे दाखल केले. असल्याची माहिती रुग्णवाहिका चालक शेषेराव लवटे यांनी दिली आहे.


