उमरगा:- लातूर – उमरगा रोडवरील बिरदेव मंदिराजवळ दुचाकीचा अपघात होऊन एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक 14 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता घडली आहे.
सविस्तर वृत्त दिनांक १४ डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास उमरगा येथुन लातुर च्या दिशेने जाणारी दुचाकी क्रमांक M H 24 B U 11 20 वरुन जात असताना मोटारसायकल च्या चालकाचा ताबा सुटल्याने मोटारसायकल चालक विशाल बिभीषण भुजबळ वय- 35 राहणार- तळणी, ता औसा हे जखमी झाले आहेत. सदर अपघाताची माहिती मिळताच उमरगा चौरस्ता येथील अपघातग्रस्ताच्या सेवेत मोफत असलेली जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी महाराज संस्थान नाणीज धाम ची रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जखमीला उप जिल्हा रुग्णालय उमरगा येथे दाखल केले. असल्याची माहिती रुग्णवाहिका चालक शेषेराव लवटे यांनी दिली आहे.


