उमरगा नगरपरिषदेत शिवसेना (शिंदे गट) – काँग्रेस आघाडीचा दणदणीत विजय; किरण गायकवाड ६,२४२ मतांनी विजयी

0
355

 

उमरगा:- नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या मतमोजणीची प्रक्रिया दि. २१ डिसेंबर रोजी सकाळी १०.००वाजता पासून ते दुपारी २.०० वाजण्याच्या दरम्यान पर्यंत अंतुबळी पतंगे सभागृहात पार पडली. या मतमोजणीत शिवसेना (शिंदे गट) व काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार किरण  गायकवाड यांनी ११,६६० मते मिळवत नगराध्यक्ष पदावर दणदणीत विजय संपादन केला.

भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचे उमेदवार हर्षवर्धन चालूक्य यांना ५,३७६ मते मिळाली  तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार रजाक अत्तार यांना ४,०१३ मते मिळाली.

नगरसेवक पदाच्या निकालात शिवसेना (शिंदे गट) ने जोरदार कामगिरी करत १२ जागांवर विजय मिळवला. त्यांच्या आघाडीतील काँग्रेस पक्षाने ६ जागा जिंकत आघाडीला स्पष्ट बहुमत मिळवून दिले. परिणामी या आघाडीने उमरगा नगरपरिषदेत एकहाती सत्ता स्थापन केली आहे.

तर भारतीय जनता पक्षाला ५ जागा, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना २ जागा मिळाल्या. निवडणूक निकाल जाहीर होताच समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून नवनिर्वाचित नगराध्यक्ष किरण गायकवाड यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

उमरगा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मधील विजयी उमेदवार व मिळालेली मते

प्रभाग क्रमांक – १

अ- घोडके सुप्रिया प्रदीप 1341 शिंदेसेना

ब- शिंदे राहुल राजीव 1297 शिंदेसेना

प्रभाग क्रमांक- २

अ- स्वामी स्वाती किरण 1152 शिंदेसेना

ब- सचिन दिलीप जाधव 1279 शिंदेसेना

प्रभाग क्रमांक- ३

अ – सोनकांबळे अश्विनी सिद्धार्थ 862 शिंदेसेना

ब- मुसांडे धनंजय नानासाहेब 973 शिंदेसेना

प्रभाग क्रमांक -४

अ- विभूते यल्लाप्पा शंकर 984 शिंदेसेना

ब- शेख बशीर खाशीम 826 शिंदेसेना

प्रभाग क्रमांक- ५

अ – धोत्रे दुर्गा इराप्पा 632 भाजप

ब- पंढरीनाथ काशिनाथ कोने 596 शिंदेसेना

प्रभाग क्रमांक- ६

अ – स्वामी राजेश्वरी नागेश 991 भाजप

ब- हंसराज उर्फ राजू अण्णाराव गायकवाड 1053 भाजप

प्रभाग क्रमांक- ७

अ- शिंदे नम्रता कैलास 929 भाजप

ब- पृथ्वीराज उर्फ विशू व्यंकटराव साळुंके 786 भाजप

प्रभाग क्रमांक-  ८

अ -विशाल किसनराव कानेकर 463 काँग्रेस

ब -औटी फातिमाबी हनिफ 585 काँग्रेस

प्रभाग क्रमांक- ९

अ- विजय महादेव वाघमारे 944 काँग्रेस

ब – शेख शमशाहदबी हबिब 759 काँग्रेस

प्रभाग क्रमांक- १०

अ- मुस्तफा उर्फ शफी बाबू मी या चौधरी 953 शिंदेसेना

ब- पवार प्रिय प्रिया शरद 1126 शिंदेसेना

प्रभाग क्रमांक- ११

अ-  मस्के बाबा चंदर 656 काँग्रेस

ब – ताराबाई महादेवआप्पा दळगडे 926 राष्ट्रवादी काँग्रेस अप

प्रभाग क्रमांक- १२

अ -अभिजीत विजयकुमार मोरे 981 काँग्रेस

ब- दिपाली विक्रम  बिराजदार 974 राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट

क- आरती अंकुश शिंदे 932 शिंदेसेना

 

नगराध्यक्षपदाचे उमेदवार

१ किरण रवींद्र गायकवाड -11660 -शिवसेना

२ हर्षवर्धन शिवाजीराव चालुक्य- 5376 – भाजप

३ आत्तार रजाक अब्दुल बाबूलाल – 4013 – ठाकरे शिवसेना

शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार किरण रवींद्र गायकवाड यांनी 6242 मताची आघाडी घेऊन विजय संपादन केला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here