उमरगा:- मुंबई – हैद्राबाद महामार्गावरील जकेकुर चौरस्ता येथील स्वामी पेट्रोल पंपा समोर दुचाकी वरुन पडून एक महिला जखमी झाल्याची घटना दिनांक 22 रोजी दुपारी 3:20 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

सविस्तर वृत्त दिनांक 22 रोजी दुपारी ठीक 3:20 वाजता उमरगा येथुन जेवळी कडे जाणारी मोटारसायकल क्रमांक MH 12 U P 21 49 वरुन जात असताना मोटारसायकल वर पाठी मागे बसलेली महीला गजराबाई महादेव कल्लशेटी वय 80 या अचानक मागे पडुन जखमी झाल्या असून ,सदर घटनेची माहिती मिळताच उमरगा चौरस्ता येथे अपघात ग्रस्तांच्या सेवेत मोफत असलेली जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी महाराज संस्थान नाणीज धाम ची रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जखमीला उप जिल्हा रुग्णालय उमरगा येथे दाखल केले . असल्याची माहिती रुग्णवाहिका चालक शेषेराव लवटे यांनी दिली आहे.


