महात्मा बसवेश्वर पुतळा विटंबना प्रकरणी ; गुंजोटी बंद

0
263

उमरगा :- महाराष्ट्र कर्नाटक सीमेलगत असलेल्या शिराढोण येथे समतानायक महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याची अज्ञात व्यक्तीकडून विटंबना करण्यात आली असून, याच्या निषेधार्थ उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथे सकल लिंगायत समाज बांधवांच्या वतीने दि. २४ रोजी बाजार पेठ व इतर ठिकाणी बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला. व उमरगा चे तहसीलदार यांना आरोपीवर कठोर कारवाई करण्या संदर्भात निवेदन देण्यात आले.

 

गुंजोटी गावातील विविध भागातून बसव अनुयायी, बसवप्रेमी जनता श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एकत्र झाले. त्यानंतर त्या ठिकाणी महापुरुषांच्या जयजयकाराच्या घोषणा देत १२ व्या शतकातील थोर समाजसुधारक, राष्ट्रीय महापुरुष, लिंगायत धर्म संस्थापक, समतानायक महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांना अभिवादन करण्यात आले. महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या अज्ञात आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी या मागणीसाठी उमरगा येथील तहसील कार्यालयास निवेदन देण्यात आले. गुंजोटी येथील व्यापारी बांधवांनी उत्स्फूर्त बंद पाळून संपूर्ण शहर कडकडीत बंद ठेवले होते सर्वच ठिकाणी दिवसभर शुकशुकाट दिसून आला.यावेळी श्री बसवण्णा समिती अध्यक्ष महेश देशमुख, उपाध्यक्ष सोमनाथ पाटील, सचिव सुनील हारगुळे, सदस्य पिंटू पाटील, रवी देशमुख, धिरज देशमुख, पिंटू साखरे, स्वप्नील देशमुख, योगेश साखरे, संगमेश्वर पाटील, प्रसाद हारगुळे, ओम कारभारी, नितीन पाटील, सोनू म्हेत्रे, सागर कारभारी, बबलु पाटील, अतुल साखरे, उमेश देशमुख यांच्यासह लिंगायत समाज बांधव व शिव -बसव प्रतिष्ठानचे दिनेश बिराजदार, अभय अष्टगे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here