उमरगा:- तालुक्यातील गुलबर्गा उमरगा रोडवर गुंजोटी पार्टी जवळ दोन दुचाकी चा अपघात होऊन एक जण गंभीर जखमी झाला आहे तर मुंबई हैदराबाद महामार्ग वरील बलसुर पाटील जवळ एक दुचाकीचा अपघात होऊन एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक 27 रोजी घडली आहे
सविस्तर वृत्त,दिनांक 27 रोजी ठीक 1:00 वाजता उमरग्या कडून गुलबर्ग्याच्या दिशेने जाणारी दुचाकी क्रमांक M H 24 C C 82 15 ने समोर जाणा-या लूना क्रमांक M H 25 A B 05 59 ला जोराची धडक दिल्याने गुलबर्ग्याकडे जाणारा दुचाकी चालक भाऊसाहेब गोविंद राठोड वय 42 राहणार काटगाव तांडा लातुर हा गंभीरीत्या जखमी झाला असून, दरम्यान दुसरा अपघात पुणे येथुन उमरग्या कडे येणारी दुचाकी क्रमांक M H 24 C B 82 86 ही बलसुर पाटी जवळील रोडच्या कटड्यावरुन स्लिप होऊन मागे बसलेली महीला सुवर्णा राजकुमार तोकमाटे वय 38 राहणार सारणी तालुका औसा ही जखमी झाली.सदर घटनेची माहिती मिळताच उमरगा चौरस्ता येथील जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी महाराज संस्थान नाणीज धाम ची रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल होऊन दोन्ही अपघातातील जखमीनां उप जिल्हा रुग्णालय उमरगा येथे दाखल केले असल्याची माहिती रुग्णवाहिका चालक शेषेराव लवटे यांनी दिली आहे.


