उमरगा:- येथील सामाजिक कार्यकर्ते भूमिपुत्र वाघ यांचा दान महोत्सव मित्रपरिवार दानशूर हजारो मित्रांच्या मदतीने दिवाळी साजरी करतात.पालावरची दिवाळी साजरी करतात.आणि दरवर्षाला थंडीमध्ये कुडकुडत असणाऱ्या शेवटच्या माणसांच्या मदतीला धावत असतात.हा महोत्सव गेली दहा-बारा वर्षांपासून उमरगा आणि परिसरामध्ये सोबत मराठवाड्यातल्या अनेक भागांमध्ये निरंतर चालू असल्याची माहिती संयोजन समितीने दिली.

प्रवीण तोतला,राजू सगर,विद्याताई वाघ, सुरेखाताई मलंग या संयोजन समितीने सुरू केलेला .दानोत्सव आज महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पोहोचल्याची माहिती समन्वयक भूमिपुत्र वाघ यांनी दिली दानोत्सवाच्या माध्यमातून अनेक वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत.पालावरच्या लोकांना वस्त्रदान करणे जुन्या नव्या कपड्यांची मदत करणे, दीपावली साजरी करणे,बर्थडे साजरा करणे, सोबत सोबत थंडीत कुरकुडणाऱ्या अनाथ असोत,मतिमंद असोत, सरकारी दवाखान्यात बाळंत झालेल्या आया असोत, ऍडमिट झालेले आजारी लोक असोत, जिथे जमेल तिथे, जिथे मन टेकेल तिथे,गरज असेल तिथे,उबदार ब्लॅंकेट नवी कपडे,जुनी कपडे, सोबत शालेय विद्यार्थ्यांना अनाथ मुलांना शैक्षणिक साहित्याची मदत करणे याचं दान करणारी उमरगा तालुक्या सोबत महाराष्ट्रामध्ये अनेक मित्र भूमिपुत्र वाघ यांच्याशी जोडले गेलेले आहेत,सोबत मॉर्निंग वॉकचा मोठा परिवार आता एकत्रित पद्धतीने दानाचा महोत्सव घडवीत आहे.ज्यांनी डोळ्यात गरीबी दारिद्र्य अनुभवलं,अशा शेवटच्या माणसांच्या मदतीला धावावं म्हणून हा महोत्सव अनेक मित्रांनी एकत्रित पद्धतीने सुरू केला आहे.भूमिपुत्र वाघ यांची मुलाखत घेतली असता.कोणी उपाशी राहू नये. कोणी थंडीत कुडकुडून नये. शैक्षणिक साहित्य नाही म्हणून कोणाचे शिक्षण बंद होऊ नये कोणी उपाशी झोपू नये.जे जे आम्ही भोगले,आमच्या वाट्याला आलं.

तसं इतरांच्या वाट्याला येऊ म्हणून हा महोत्सव मित्राच्या मदतीतून घेण्यात येत असल्याची माहिती भूमिपुत्र वाघ यांनी दिली.या महोत्सवामध्ये ऍड प्रवीण तोतला कॉन्ट्रॅक्टर राजू सगर साहेब, बापू बिराजदार,मॉर्निंग वॉकचे सर्व मित्र,महाराष्ट्रातील अनेक मित्रामध्ये निशिकांत मुपीड, प्रल्हाद जोशी, श्रीकांत भाभे,विश्वनाथ (अण्णा) तोडकर, विलास कुलकर्णी,संजय देशमुख,सुरेखाताई मलंग,डॉक्टर कल्पना वाघ,निकिता वाघ, मूगळे कोचिंग क्लासेसचे मुगळे सर अशा अनेक मित्र परिवारातून हा दान महोत्सव नियमित चालू असल्याची माहिती भूमिपुत्र वाघ दिली….


