उमरगा :- तालुक्यातील कोरेगाव वाडी येथील शिवाई चॅरिटेबल ट्रस्ट संचलित कॉलेज ऑफ फार्मसी, येथे दि.2 रोजी शशी फायर सेफ्टी कॉलेज, निलंगा यांच्या सहकार्याने अग्नी सुरक्षा मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते . यावेळी संस्थेचे अध्यक्ष बी.एच. बेडदुर्गे, सचिव डॉ. विजय बेडदुर्गे, उपाध्यक्ष प्रा. अजय बेडदुर्गे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शशी फायर सेफ्टी इन्स्टिट्यूट येथील प्राध्यापक रोहीत सातपुते, यांनी आदिनाथ कांबळे, सिद्धांत कांबळे, विशाल गंगावणे या विद्यार्थ्यांच्या मदतीने प्रात्यक्षिक दाखवून आगी पासून सुरक्षा कशापद्धतीने केली जाते याबद्दल माहिती दिली.अग्नि सुरक्षा प्रशिक्षणामध्ये आग कशी लवकर भडकते, त्याची कारणे काय असतात,विविध प्रकारच्या आगी आणि त्यांचे नियंत्रण कसे करावे, अग्नि निवारण यंत्रे कशी वापरावी, इमारतीतून सुरक्षित बाहेर पडण्याचे मार्ग, अग्नि दुर्घटनेनंतर प्राथमिक उपचार कसे करावे याबद्दल सखोल मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी प्राचार्य महेश कदारे, डॉ.अश्विनी सूर्यवंशी, प्रा.परीक्षित शिरूरे, प्रा.किरण पांचाळ, प्रा.अशोक गायकवाड, प्रा.श्रीकृष्ण मुळे, प्रा.धनश्री भुजंगे, प्रा.वैष्णवी फुगटे, प्रा.चनबस शेटगार, प्रा.अंकिता यादव, प्रा. ओमकार पाटिल, प्रा.मंजुषा गव्हाळे, प्रा.किर्ती आर्य, प्रा.खुशी पाचंगे, प्रा.अमर माळी आदी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.


