विद्युत तारांच्या घर्षणाने ठिणग्या पडुन मुळज शिवारातील 3 एकर ऊस जळून खाक

0
291

उमरगा:- तालुक्यातील मुळज शिवारातील वलीपाशा गफुर वाडीकर यांचे जमीन गट क्र. 211/2/1 व जमीन गट क्र. 211/2/3 मध्ये एकुण क्षेत्र 00 हे. 58 आर, व दस्तगीर गफुर वाडीकर यांचे जमीन गट क्र. 211/2/1 मधील क्षेत्र 00 हे. 60 आर, या जमीनीतील ऊसाला  विद्युत पोलच्या तारांमध्ये घर्षण होऊन त्यामधुन ठिणग्या पडुन सदरच्या ठिणग्यामुळे वर नमुद ऊस आग लागुन  दि.8 रोजी जळाले असल्याची घटना घडली आहे.यामुळे शेतकऱ्यांचे खुप मोठ्याप्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.या घटनेसंदर्भात ची लेखी स्वरूपात माहिती महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी शाखा उमरगा येथील कार्यालयास, उमरगा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रल्हाद सुर्यवंशी यांना एका निवेदनाद्वारे संबंधित शेतकऱ्यांनी लेखी स्वरूपात कळवले आहे.

 

सविस्तर वृत्त, मौजे मुळज ता. उमरगा जि. धाराशिव येथील जमीन गट क्र. 211/2/1 मध्ये एकुण क्षेत्र 100 हे. 60 आर, इतकी जमीन आहे. सदर संपुर्ण जमीनीमध्ये ऊस पीक आहे. सदरचे ऊस हे 11 महिन्याचे असुन ते कारखान्यास जाण्याच्या स्थितीमध्ये होते. सदरच्या  क्षेत्रामधुन महावितरण कंपनीचे पोल आहेत व त्यावरील तारा या यापुर्वीही एकमेकांस घर्षन होऊन ठिणग्या पडून जाळ होत होता, त्या अनुषंगाने वारंवार महावितरण कार्यालय, उमरगा व संबंधीत कर्मचारी यांना तोंडी विनंती केली होती की, सदर विद्युत तारांचे घर्षन होऊ नये याबाबतची व्यवस्था करण्यात यावी, परंतु वारंवार सदर बाबीकडे महावितरण कार्यालय व संबंधीत कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष झाले. दि.08/01/2026 रोजी सकाळी मी शेताकडे गेलो असता  निदर्शनास आले की, माझ्या शेतातील विद्युत पोलच्या तारांमध्ये घर्षण होऊन त्यामधुन ठिणग्या पडत आहेत व सदरच्या ठिणग्यामुळे माझ्या क्षेत्रामधील ऊस व माझ्या शेजारी असलेल्या शेतकऱ्याच्या ऊसामध्ये आग लागली आहे, त्यानंतर मी  शेजाऱ्यांना आवाज देऊन सदरची आग विजविण्याचा प्रयत्न केला परंतु  संपुर्ण ऊसाला आग लागली व  ऊस जळुन फार मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. नमुद क्षेत्राची प्रत्यक्षात स्थळपाहणी करुन पंचनामा करून प्रशासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पिडीत शेतकऱ्यांच्यावतीने करण्यात आली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here