उमरगा :- शहरातील ॲड. शीतल चव्हाण फाऊंडेशनच्या वतीने दिनांक 11 रोजी उमरगा-लोहारा परिसरातील महिला राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी सिंदखेडराजाकडे रवाना झाल्या. सर्व जिजाऊंच्या लेकींना अल्पोपहार, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या आणि पुस्तके अशी प्रेमाची शिदोरी देण्यात आली.
ॲड. शीतल चव्हाण फाऊंडेशनकडून सिंदखेडराजाला निघालेल्या या सर्व जिजाऊंच्या लेकींना अल्पोपहार, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या आणि पुस्तके अशी शिदोरी देण्यात आली. ही शिंदोरी ॲड. शीतल चव्हाण फाऊंडेशनचे पदाधिकारी सत्यनारायण जाधव, ऍड. अर्चनाताई जाधव, शबाना उडचणे, धानय्या स्वामी, किशोर बसगुंडे यांनी जिजाऊ ब्रिगेडच्या भगिनींना दि.11 रोजी सकाळी ठिक 6 वाजता उमरगा बसस्थानक येथे दिली. तसेच महिलांना बसमध्ये बसवून, सुखी व सुरक्षित प्रवासासाठी शुभेच्छा देवून त्यांची पाठवणी केली.सिंदखेड राजाच्या प्रवासासाठी जिजाऊ ब्रिगेडच्या शिवमती रेखाताई पवार यांनी पुढाकार घेतला.


