रोटरी क्लब व व्यापारी महासंघाच्या वतीने मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन 

0
279

 

उमरगा : रोटरी क्लब उमरग्याच्या वतीने रविवारी (ता.११) रोजी मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेचे उद्घाटन आमदार प्रवीण स्वामी, नुतन नगराध्यक्ष किरण गायकवाड, रोटरीचे माजी प्रांतपाल डॉ. दिपक पोफळे, अध्यक्ष डॉ.प्रा. धनंजय मेनकुदळे, सचिव प्रा राजू जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

या मॅरेथॉन स्पर्धेत लातूर ,सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील स्पर्धक मोठया संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेत एकूण २०० स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी शाम दूधभाते, रोहित, तानाजी लेंडवे, संतोष जाधव, मालाजी काळे, येवते, प्रोजेक्ट चेअरमन अनिल मदनसुरे, डॉ. राजकुमार कानडे , नितीन होळे, कमलाकरराव भोसले, सोमशंकर महाजन,देवप्पा सूर्यवंशी, संजय देशमुख, जुगल खंडेलवाल, प्रा. युसुफ मुल्ला, ऍड. अक्षय तोतला, परमेश्वर सुतार, प्रा.विनोद देवकर, शिवकुमार दळवी , प्रा. रवी आळंगे शिवाजी महाविद्यालयाच्या एन.एस.एस.च्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला.

उमरगा मॅरेथॉनच्या स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी श्रीकृष्ण विद्यालयाच्या विद्यार्थ्यानी ढोल पथकांच्या सहाय्याने स्वागत केले. मुख्याध्यापक आर.आर.पाटील व डॉ. नजीर शेख यांनी एनर्जी ड्रिंक्स देऊन स्पर्धकांचा उत्साह वाढविला.

—————–

नामदेव भोसले (खुला गट पुरुष प्रथम) ७१०० व स्मृतीचिन्ह, अंकित गरड ( द्वितीय) ५१०० व स्मृतीचिन्ह, करण दासे (तृतीय) ३१०० व स्मृतीचिन्ह, राजनंदिनी सूर्यवंशी ( खुला गट महिला प्रथम) ३१०० व स्मृतीचिन्ह, , दुर्गा पवार ( द्वितीय) २१०० व स्मृतीचिन्ह, प्रीती माने (तृतीय) ११०० व स्मृतीचिन्ह, विकास कातपुरे ( 45 वर्ष गट प्रथम) ३१०० व स्मृतीचिन्ह, गोविंद चौधरी (द्वितीय) २१०० व स्मृतीचिन्ह, विद्यासागर फुलसुंदर (तृतीय) ११०० व स्मृतीचिन्ह या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. माजी आमदार ज्ञानराज चौगुले, अनिल( पप्पू) सगर, मनेष माणिकवार , बालाजी गायकवाड, प्राचार्य डॉ. संजय अस्वले, मानसी क्लास सेंटर, अॅड. अक्षय तोतला, संदीप फुटवेअर, अंबिका रेडिमेड क्लॉथ, अंकुश जाधव आदिंनी पारितोषीक व स्पर्धेसाठी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here