लोहारा पोलीसांची उल्लेखनीय कामगिरी ; 105320 रुपयांचा गांजा जप्त , दोघांवर गुन्हा दाखल 

0
821

लोहारा:- तालुक्यातील जेवळी येथील एक महिला आपल्या स्वतःच्या राहत्या घरी फर्शीच्या खाली लोखंडी पत्र्याचे कोठीमध्ये स्वतःचे आर्थीक फायद्यासाठी, विनापरवाना बेकायदेशीररित्या १०,५,३२०/रुपये किंमतीचा गांजा सदृश वनस्पती विक्री करण्याच्या उद्देशाने ताब्यात बाळगतांना मिळुन आल्याने लोहारा पोलीसांनी संबंधित महिलेवर कारवाई करुन दि 18 रोजी गुरनं १०/२०२६ कलम कलम ८ (क), २० (ब) (ii) (ब) गुंकीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ प्रमाणे गुन्हा दाखल केला असल्याची घटना घडली आहे.

सविस्तर वृत्त ,उमरगाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार  यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पोलीस स्टेशन लोहारा हददीमधील मौजे जेवळी येथील एक महिला तीच्या राहते घरी गांजा बाळगुन ती विक्री करते अशी बातमी मिळाल्याने सदरची बातमी पोलीस स्टेशन लोहारा येथील पोअं बळीराम सोनटक्के यांना कळवुन सदर बातमीची खात्री करीता त्यांना रवाना करुन सदर बातमीची खात्री केली व करुन सदर बातमी ही लोहारा पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी  विजय पवार यांना कळवुन त्यांनी तात्काळ आपले पथकासह रवाना होवुन तेथे सापळा लावुन मौजे जेवळी येथील गोरीबी जबार शेख वय ७८ वर्ष रा. जेवळी, ता. लोहारा जि. धाराशिव हिस ताब्यात घेवुन तिचे राहते घराची पहाणी केली असता तिचे मौजे जेवळी येथील राहते घरी फर्शीच्या खाली लोखंडी पत्र्याचे कोठीमध्ये स्वतःचे आर्थीक फायद्यासाठी, विनापरवाना बेकायदेशीररित्या १०,५,३२०/रुपये किंमतीचा गांजा सदृश वनस्पती विक्री करण्याच्या उद्देशाने ताब्यात बाळगतांना मिळुन आल्याने पोलीस स्टेशन लोहारा येथे दिनांक १८/०१/२०२६ रोजी गुरनं १०/२०२६ कलम कलम ८ (क), २० (ब) (ii) (ब) गुंकीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ प्रमाणे आरोपी  गोरीबी जबार शेख वय ७८ वर्ष २) अलीअकबर अब्दुल शेख दोघे रा. जेवळी (उत्तर) ता. लोहारा जि. धाराशिव यांचेवर गुन्हा दाखल असुन सदर गुन्हयाचा तपास हा पोउपनि  एस. डी. केंद्र हे करीत आहेत.सदरची उल्लेखनीय कामगिरी ही धाराशिवच्या पोलिस अधीक्षक रितु खोखर, अप्पर पोलीस अधीक्षक, शफकत आमना, उमरगाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव शेलार, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन लोहारा येथील सपोनि विजय पवार, पोउपनि  सचिन केंद्रे, पोह ढवण, पोअं बळीराम सोनटक्के, पोअं विक्रम काकडे, मपोअं  सिता घायाळ, मपोअं  अर्चना साळुंके, तसेच चालक पोना देवकर, चालक पोअं यांनी बजावली आहे.अशी माहिती लोहारा पोलीस ठाण्याचे जनसंपर्क अधिकारी तथा प्रभारी अधिकारी यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here