लातूर – उमरगा रोडवरील सागर बार जवळ ट्रक – मोटारसायकल चा अपघात; एक गंभीर जखमी, एकाचा मृत्यू 

0
881

उमरगा :- शहरापासून जवळच असलेल्या लातूर – उमरगा रोडवरील हाॅटेल सागर बार जवळ दि.28 रोजी दुपारी 1.45 वाजण्याच्या सुमारास ट्रक व दुचाकी चा अपघात होऊन एक जण गंभीर जखमी झाला आहे तर एक जणास रुग्णालयात तपासणी करुन वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषित केले असल्याची घटना घडली आहे.

सविस्तर वृत्त, दि. 28 रोजी दुपारी ठीक 1:45 वाजता उमरगा येथुन लातुर च्या दिशेने जाणारी दुचाकी क्रंमाक M H12 P W 9382 वरुन जात असताना मागुन येणाऱ्या ट्रक क्रमांक C G 07 B A 43 96 ने जोराची धडक दिल्याने दुचाकी वरील दोघे गंभीर जखमी झाले . सादिक कळवाली शेख वय 22 राहणार साहेब जवळगा हा गंभीर जखमी झाला असून, अभिषेक महादु शिरसे वय 25 राहणार साहेब जवळगा यास तपासणी करून डॉक्टर ने मयत घोषित केले असल्याची घटना घडली आहे.सदर अपघाताची माहिती मिळताच उमरगा चौरस्ता येथे अपघात ग्रसताच्या मदतीला मोफत असलेली जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी महाराज संस्थान नाणीज धाम ची रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जखमीला उप जिल्हा रुग्णालय उमरगा येथे दाखल केले असल्याची माहिती रुग्णवाहिका चालक शेषेराव लवटे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here