धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्ष,उपाध्यक्ष 13 मार्च रोजी पदावर विराजमान

0
110

धाराशिव:-  धाराशिव जिल्हा परिषदेची सार्वत्रिक निवडणूक दि.02 रोजी झालेल्या असुन, निर्वाचित सदस्यामधुन महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या आधिनियम १९६१ मधील कलम ११ (१) मधील तरतुदीनुसार, राज्य शासनाने दिलेल्या सुचनांप्रमाणे दि.13 मार्च 2026  रोजी अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवडणुक  जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये दुपारी २.०० वाजता घेण्यात येणार असल्याची माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे धाराशिव जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत देण्यात आली आहे.

ज्याआर्थी महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या आधिनियम १९६१ मधील कलम ४५ (२) व तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषदा (अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समितीच्या सभापती) व पंचायत समित्या (सभापती व उपसभापती) (पदांचे आरक्षण व निवडणुका) नियम १९६२ मधील २ व नुसार जिल्हा परिषद धाराशिवचे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीकरीता दि.१३.०३.२०२६ रोजी जिल्हाधिकारी, धाराशिव यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद सभागृहात विशेष बैठक आयोजित करण्यात येत आहे.

ज्याअर्थी क्र. जिपनि-२०२५/प्र.क्र.१२ ज//पंरा-२ ग्राम विकास विभाग मंत्रालय, मुंबई दि.०९.०९.२०२५ अन्वये धाराशिव जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद हे सर्वसाधारण महिला” साठी आरक्षीत आहे.

त्याअर्थी उक्त नियमाचे कलम ४५ मधील १ नुसार अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या निवडीसाठी विशेष सभा बोलविण्याबाबत व सदर निवडीकरीता पीठासीन अधिकारी यांची नियुक्ती करावयाची तरतूद आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी ” किर्ती किरण पुजार, जिल्हाधिकारी धाराशिव ” नियम २ मधील तरतुदीनुसार हे पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहतील.

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धाराशिव यांनी दि.१३.०३.२०२६ रोजी दुपारी २.०० वाजता होणा-या विशेष बैठकीसाठी उपस्थित राहण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व निर्वाचीत सदस्यांना विहित नमुन्यातील नोटीसांची नियमाप्रमाणे मुदतीच्या आत बजावणी करावी. बैठकीची कार्यक्रम पत्रिका खालील प्रमाणे आहे.

कार्यक्रम पत्रिका

दिनांक 13 मार्च 2026 रोजी ,स.१०,०० ते १२,०० पर्यंत

1. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी नामनिर्देशनपत्र स्विकारणे

दुपारी ०२.००

२. सभेस सुरुवात करणे. उक्त सभा खालील प्रगाणे पार पडेल

दुपारी ०२.०० ते ०२.१५

३. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी प्राप्त नामनिर्देशनपत्राची तपासणी

४. नामनिर्देशनपत्राची छाननी

दुपारी ०२.१५

५. वैधरित्या नागनिर्दिष्ट उमेदवारांची नावे वाचुन दाखवणे.

दुपारी ०२.१५ ते ०२.३०

६. उमेदवारी परत घेणे,

दुपारी ०२.३५ वा.

७. उमेदवारी परत घेतलेल्या उमेदवारांची नावे वाचुन दाखवणे,

दुपारी ०२.४० वा.

८. निवडणूक लढविणा-या उमेदवारांची नावे वाचुन दाखवणे,

दुपारी ०२.४० ते कामकाज संपेपर्यंत

९. आवश्यक असल्यास मतदान, प्रथम अध्यक्ष पदासाठी व नंतर उपाध्यक्ष पदासाठी,१०. निवडणूकीचा निकाल जाहीर करणे.

उपरोक्त कार्यक्रमानुसार प्रथम अध्यक्षपदाची निवडणुक घेण्यात येईल, व त्यानंतर लगेच त्याच पध्दतीचा अवलंब करून उपाध्यक्षपदाची निवडणुक घेण्यात येईल. सभेचा इतिवृत्तांत त्याच वेळी पुर्ण करण्यात येईल तसेच त्याची नोंद जिल्हा परिषदेच्या इतिवृत नोंदवहीमध्ये अभिलेखित करण्यात येईल. आणि इतिवृत्ताची प्रमाणीत प्रत त्याच दिवशी सायंकाळी शासनास सादर करण्यात येईल, या सर्व बाबीसाठी लागणारी सर्व आवश्यक व्यवस्था मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, घाराशिव यांनी उपलब्ध ठेवावी. असे आदेश जिल्हाधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here